प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
अक्षरसंख्यामहत्त्व आणि प्रगाथाची घटना.- प्रगाथ नांवाचें पठन सुध्दां ह्याच तत्वांवर केलें आहे. प्रगाथ म्हणण्याची ही संकीर्ण पध्दति ऋक्संहितेंतल्या बऱ्याचशा भागाच्या उत्पादनकालीं असावी अशी वेवरनें आधार न देतां समजूत व्यक्त केली आहे.
वृत्ताकल्पना पालुपद तयार करण्यांत पूर्णपणें व्यक्त होते. वृत्तकल्पना मात्राश्रयी असेल तर पालुपद देखील मात्राश्रयी असलें पाहिजे. वैदिक कालीं पालुपद हें अक्षरसंख्याश्रयी होतें मात्राश्रयी नव्हतें हें प्रगाथविषयक विवेचनावरून स्पष्ट होईल. प्रगाथांतील पुनरुक्ति अक्षरसंख्याक होती. येथें थोडेंसें प्रगाथस्पष्टीकरण केलें पाहिजे.