प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १ लें.
उपोद्धात-जगांतील स्पर्धा.

स्पर्धेचीं अंगें :—  आपणांस जें निरिक्षण करावयाचें तें सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक या निरनिराळ्य़ा दृष्टींनीं करावें लागेल, तेव्हांच आपणांस आपले हितसंबंध पूर्ण कळूं लागतील.  कां कीं स्पर्धा या सर्व बाबतींत आहे.