प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )/
प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.
न्यायपद्धति.- न्यायशासनविषयीं पाहतां, या देशांत कायद्याची अक्षरशः अंमलबजावणी करण्यांत येते; पण पुष्कळ वेळां या कामात फार अनियंत्रितपणआ दिसून येतो.
चीनप्रमाणेंच येथेंहि बांबूच्या काठीनें फटके मारण्याच्याच बहुतेक शिक्षा असतात; प्रत्येक वरिष्ठ अधिकार्याला शिक्षा देण्याचा अधिकार आहे असें दिसतें. लांकडी खोडा गळ्याभोंवतीं
अडकविण्याचा दुसरा एक शिक्षेचा प्रकार आहे. या देशांत दंड म्हणून पैसे घेण्याची चाल नाहीं. इतर शिक्षा चिनी लोकांप्रमाणेंच आहेत.
तुरुंग म्हणजे भयप्रद गलिच्छ संस्था आहेत. अलीकडे देहान्त शिक्षा बहुधा दिली जात नाहीं. ही शिक्षा देण्यांत आल्यास प्रथम तो खटला स्टेट काउन्सिलकडे तपासणीसाठीं जाऊन राजानें अनुमोदन दिल्यानंतरच ही शिक्षा कायम होते हें स्तुत्य आहे. लहानसहान खटल्यांचा निकाल ग्रामाधिपति करितो. खेड्यांतील लोकांचें या निकालानें समाधान न करितो. खेड्यांतील लोकांचें या निकालानें समाधान न झाल्यास, फिरत्या कोर्टाकडे त्यांनां अपील करितां येतें व हाहि निकाल बरोबर नाहीं असें वाटल्यास जिल्हाकोर्टाकडेहि अपील करितां येतें. प्रांतांतील लष्करी अधिकार्याकडे केलेलें अपील शेवटचें असतें; परंतु ते अधिकारी लांचखाऊ असतात; एकंदरींत न्यायाधीश मात्र स्तुतीस पात्र असतात, कारण, सर्व महत्त्वाच्या फिर्यादी पूर्णपणें व सदसद्विवेकबुद्धीनें तपासून, साक्षीदारांचें म्हणणें काळजीपूर्वक ऐकून घेतल्यानंतरच ते खटल्याचा निकाल देतात.