प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ५ वें.
भारतीय संस्कृतीचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील परिणाम.

चिनी सत्ता.- १४०७ मध्यें सुभेदार झाल्यावर त्यानें तेथें पूर्णपणें चिनी राज्यपद्धति सुरू केली. शिवाय त्यानें बादशाहाकडे त्या देशांतील सविस्तर माहितीचा अहवालहि पाठविला; त्यांत एकंदर शहरें व तेथील लोकसंख्या यांबद्दल बरोबर आंकडे दिलेले होते. या देशाचे अगदीं जुनें नकाशे या काळापासूनच उपलब्ध आहेत. शिवाय चिनी बादशाहानें ७ हजार टांकिनी लोक आपल्या दरबारांत चिनी शिक्षण घेण्याकरतां आणले होते. शिक्षण घेऊन त्याचा पुढें आपल्या जन्मदेशांत त्यांनीं प्रसार करावा असा उद्देश होता. या असल्या उपायांनीं टांकिन हा पूर्णपणें अगदीं चिनी प्रांत बनला.