प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

आर्थिक स्थिति.- कुटुंबांतील धाकटे भाऊ व इतर असंतुष्ट लोक हे सरदारांच्या आश्रयास जाऊन त्यांची नोकरी करितात अथवा भिक्षू होतात. सरदार लोक व मठवासी भिक्षू यांनां जमिनीवरील हक्क फार असल्यामुळें व ते अगोदरच श्रीमन्त असल्यामुळें अधिकाधिक संपत्ति जमवितात परंतु कुळांच्या वांट्यास उत्पन्नाचा फारच थोडा अंश येत असल्यामुळें तीं जमिनीच्या मशागतीकडे बिलकुल लक्ष देत नाहींत. बरीचशी जमीन लागवडीशिवाय पडलेली आहे व कांहीं केवळ खडकाळ व बर्फाच्छादित आहे.