प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ७ वें.
हिंदुस्थान आणि चीन, जपान व तिबेट.

भाषा बोलणारांची संख्या. - ब्रिटिशहिंदुस्थानच्या बाहेर निरनिराळ्या तिबेटी भाषा बोलणारे लोक किती आहेत याविषयीं विश्वसनीय माहिती मिळत नाहीं. १९०१ आणि १९११ सालच्या खानेसुमारीच्या रिपोर्टमध्यें हिंदुस्थानांत तिबेटीभाषा बोलणारांची संख्या पोटभाषावार दिली आहेः-

 भाषा   लोकसंख्या १९०१  लोकसंख्या १९११
 तिबेटी   १४,८१२  ६,०२०
 बाल्ती  १,३०, ६७८  १,३२,१९९
 लडाखी  ९०  ५४,७६१
 शर्प  ४,४०७  ५,१८६
 दन्जान्गक   ८,८२५  ११,५६२
 ल्होके   ४०,५९०  ८,६८०
 इतर   ३५,८२२  ११,४२९
 एकंदर  २,३५,२२४  २,२९,८३७