प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )
प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती
ब्रिटिश कोलंबिआ.- सन १९१४ सालच्या आरंभीं पूर्वेकडील भागांतून हिंदी लोकांचें एक जहाज व्हानकुवरकडे जाण्यासाठीं निघालें. परंतु, हें जहाज बंदरांतच अडकवून ठेवून त्यावरील उतारूंनां जमिनीवर उतरण्याची परवानगी न देतां अखेल तें जहाज हिंदुस्थानाकडे परत पाठविण्यांत आलें. हिंदी लोकांच्या प्रश्नाला ब्रिटिश कोलंबिआंत या प्रकारानें एक प्रकारचें उग्र स्वरूप प्राप्त झालें. ता.२६ सपटंबर १९१४ रोजीं कोमागातामारू जहाज हिंदुस्थानाकडे परत पाठविण्यांत आलें. हिंदी लोकांच्या प्रश्नाला ब्रिटिश कोलंबिआंत या प्रकारानें एक प्रकारचे उग्र स्वरूप प्राप्त झालें. ता. २६ सपटंबर १९१४ रोजीं कोमागातामारू जहाज कलकत्त्यास परत आलें. तो एक मोठा दुःखाचाच प्रसंग होता. हिंदी लोक कांहीं तरी चळवळ करतील अशा अपेक्षेनें या परत आलेल्या लोकांनां घरीं पोंचविण्यासाठीं रेल्वेच्या खास गाड्यांची सरकारनें सोय केली. १९१४ च्या पांचव्या ऑर्डिनन्सप्रमाणअं अशी तजवीज करण्याचा अखत्यार सरकारनें आपल्या हातीं घेतला होता. त्याप्रमाणें परत आलेल्या लोकांपैकीं सुमारें ६० लोक आपापल्या घरीं गेले. परंतु बाकीच्या लोकांनीं गुरुदत्तसिंग नांवाच्या एका माणसाच्या नेतृत्वाखालीं कलकत्त्यास परत जाण्याचा प्रयत्न केला. लष्करी मदत घेऊन या लोकांनां मागें परतविण्यांत आलें. परंतु. यांच्यासाठीं दुसर्या स्पेशल गाडीची व्यवस्था होत असतां यांनीं पोलिस व इतर अधिकारी यांच्यावर गोळीबार सुरु केला. लष्करी लोकांनीं शेवटीं बंदुका झाडून गर्दी मोडली व त्यांपैकी बहुतेकांस कैद केलें. लष्करी लोकांनीं शेवटीं बंदुका झाडून गर्दी मोडली व त्यांपैकीं बहुतेकांस कैद केलें. कलकत्ता पोलिसपैकीं सार्जंट ईस्टवुड, व ई. बी. एस्. रल्वेवरील मि. लोनाक्स हे मरण पावले. पंजाब पोलिसांपैकीं एकजण मेला व सहाजण जखमी झाले. दंगेखोलांपैकीं १६ व प्रेक्षकांपैकीं २ असे इसम गतप्राण झाले. या एकंदर प्रकरणाची चौकशी करण्याकरितां हिंदुस्थान सरकारनें सर विलिअम व्हिन्सेंट यांच्या अध्यक्षतेखालीं एक कमिशन नेमलें व या कमिशननें पंजाबांत व कलकत्त्यांत साक्षी घेतल्या.
ब्रिटिश कोलंबिआंत चार हजार हिंदी लोक वसाहत करून राहिलेले आहेत. यांपैकी बहुतेक शीख लोक आहेत. हे लोक बहुधा शेतकी कामाकडे किंवा कारखान्यांतून अगर गुदामांतून मजुरी करीत असतात. त्यांनां आपलीं बायकामुलें हिंदुस्थांनांतून आणण्याची इच्छा उत्पन्न झाली, यावरून त्यांनां कोलंबिआंतील परिस्थिति आवडते व तेथें त्यांची स्थिति एकंदरीनें ठिक आहे असें दिसते. कोलंबिआंतील अधिकारी लोकांची त्यांच्याशीं जी वर्तणूक आहे तिचें बीज एकंदरींत आशिआटिकांनां कोलंबिआंत घ्यावयाचें नाहीं या धोरणांत आहे. या अधिकार्यांनां असें वाटतें कीं, आशिआटिक लोकांनां निष्प्रतिबंध रीतीनें कोलंबिआंत येऊं दिलें तर कोलंबिआ हा गोर्या लोकांकरितां आहे या तत्त्वाला हळू हळू बाध येऊं लागेल. जपान व चीन या देशांतील लोकांशी निराळे तह करून जपानचे लोक दरसाल ठराविक प्रमाणांत व चीनचे लोक ५०० डॉलर्सची प्रवेश फी प्रत्येक माणसामागें घेऊ घेण्यांत येतात.