प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
सुदास.- वसिष्ठ, विश्वामित्र (सुदासाचे उपाध्याय), वसिष्ठ- संबंध:- अगस्ति, अगस्त्य (वसिष्ठ बंधु), शतयातु (कदाचित् वसिष्ठ पुत्र) जरुथ, शिश्नदेव, पराशर, वामदेव (वसिष्ठाशी संबधं), अगस्त्य संबंध.- मान (अगस्त्याचा पिता), मान्य (मानपुत्र), मान्दार्य मान्य (कदाचित् मानवंशज), खेल (अगस्त्याचा यजमान), विश्पला (खेलाची बायको), तृणस्कंद (अगस्त्यांशीं अनिश्चित संबंध); वामदेवसंबंध - बुहदुक्थ, आजमीळह (वामदेव पुत्र).
वि श्वा मि त्र सं बं ध:- जान्हव (विश्वामित्राचें पैतृकनांव), गाथिन् (विश्वामित्राचा बाप), कुशिक (विश्वामित्राचा कुल पुरुष); मधुछंदस्, शुन:शेप, गाथिन (विश्वामित्रपुत्र); शुन:शेप- संबंध.- अयास्य आंगिरस् (शुन:शेपाच्या वधविषयक यज्ञांत उद्रात्याचें काम करणारा); जमदग्नि (विश्वामित्राचा मित्र), गय:लात (जगदग्नीशी अनिश्चित संबंध), मगंद (विश्वामित्रो-ल्लिखित.)
कण्व- यदुतुर्वशांचे पुरोहित. अंगिरस् (कण्वाचा आजा). कण्व- संबंध.- काण्व, प्रस्कण्त्र, प्रगाथ, पर्वत, नृषद् संबंध- नार्षद (नृषदपुत्र), दशशिप्र, उपस्तुत, वृष्टिहव्य (उपस्तुतचापिता), वृषन् (उपस्तुत् सहोच्चारित), मेधातिथि, विभिंदु, सोभरि, सुदेव, संवर्त, श्रुतकक्ष, शिंजार, शरभ, प्रियमेध, नीपातिथि, वैयश्व, पृषघ्र, श्रुष्ठिगु, तिरश्ची, कौरयाण, दस्यवेवृक, नार्य, पार्षद्वाण, मातरिश्वन्, शर शौरदेव्य, श्रुतर्वन् आर्क्ष, नृमेधस् शकपूत (नृपेधपुत्र), शीस्त, गोशर्य, तुग्र, दशव्रज, अंशु, स्यूमरश्मि, सृबिंद, एकद्यु, विश्वमनस्, पृदाकुसानु, काण्वायन, नभाक, त्रिशोक (हे सर्व कंण्त्रकुलोत्पन्न असावेत); निंदिताश्व (कण्वांचा आश्रयदाता).
अंगिरससंबंध:- गोतम, दध्यनिच, अथर्वण, व्यश्व, विरुप, कृष्ण, हिरण्यस्तूप, अर्चत् (हिरण्यस्तूपशुत्र), सप्तगु (हे अंगिरस असावेत); व्यश्वसंबंध-सुषामन्, वसुरोचिष्, हरयाण (व्यश्वाला दानें देणारे); वत्स (कण्वपुत्र), सप्तवध्रि, पुतकता, शृंगवृष, श्यावक, कृप (श्यावकसहोच्चारित); अध्रिगु कलि, (हे सर्व कण्वोल्लिखित आहेत).
पाशद्युम्नवायत, वीतहव्य वैशंत; चेदी (सुदाससमकालीन), चेदी संबंध.- कशु; युध्यामधि, याद्व, देवक, मान्यमान, चायमान (सुदासचे शत्रू), चायमानसंबंध- वरशीख (कदाचित् चायमानाचा शत्रू ); तृत्सु (सुदासाशीं प्रजा नात्यानें असणा-या लोकांचें घराणें); प्रतृद (तृत्सूचें दुसरें नांव); पृथु (सुदास सहायक);
सु दा स वं श ज- इंद्रोत (सुदासपुत्र), आतिथिग्व (इंद्रोतचें पैतृक नांव), पुरुमाय्य (कदाचित् सुदासपुत्र), ॠक्ष (इन्द्रोतसहोच्चारित).
भरत (सुदास, तृत्सु, विश्वामित्र वगैरेंचें कुल). दिर्घतमस मामतेय (भरतांचा उपाध्याय); कक्षीवान् (दीर्घतमस्पुत्र), पज्र (कक्षीवानाचें घराणें), ममता (दीर्घतमस्ची आई), मामतेय (दीर्घतमस्चें मातृक नांव), त्रैतन (दीर्घतमस्चा शत्रु).
क क्षी वा न सं बं ध.- औशिज (कक्षीवानाचें मातृक नांव), वृचया (कक्षीवानाची बायको), घोषा (कक्षीवानाची मुलगी), स्वनय, भावयव्य, भाव्य (कक्षीवानाचे पुरस्कर्ते); प्रियरथ, श्रुतरथ (कक्षीवानाचे आश्रयदाते); भा व य व्य सं बं ध.- रोमशा (भावयव्याची बायको); औ शि ज सं बं ध.- ॠजिश्वन् (औशिज), वैदथिन् (ॠजिश्वन्चे पैतृक नांव); पिप्रु (ॠजिंश्वन्करितां पराभव केलेला); आयवस (याच्या तीन मुलांनी कक्षीवानास पीडा केली); मशर्शार (याच्या तीन मुलांनी कक्षीवानास पीडा केली); वृषणश्व (कक्षीवानसहोल्लिखित); वृ ष ण श्व सं बं ध.- मेना (वृषणश्वदुहिता); वाय्य, शर, आर्चत्क, दिर्घश्रवस भुज्यु, तौग्रय, रथप्रोष्ठ, पृथुश्रवस्, कानीत, वश, तरुक्ष, विष्णापु, (कक्षीवानोल्लिखित). विष्णापुसंबंध.- विश्वक (विष्णापूचा मुलगा), वध्रिमती, पुरंधि, हिरण्यहस्तश्याव, द्योतन, शयु, पेदु, (कक्षीवानोल्लिखित); गन्धारि (कक्षीवानाशी अनिश्चितसंबंध); तकवान, (कक्षीवानवंशज), अत्रि (कक्षीवान्, कण्त्र, आणि गौतम यांच्याशी अनिश्चितसंबंध); (पुरुंचे पुरोहित). अ त्रि सं बं ध- अर्चनानस (अत्रिपुत्र), पुरुवसु, पुरुरु, गोपवन, सध्रि, मायिन्, विश्ववार, सुनीथ, सत्यश्रवस्, शौचद्रथ, आग्निवेशि शत्रि, सदापृण, सत्यश्रवस् वाय्य, गविष्ठिर आत्रेय, यजत, अवत्सार, मनस् , क्षत्र (अत्रिवंशज).
भरतसंबंध.- देवश्रवस् , देवव्रत जन्हु (भरतकुलोत्पन्न).
दिवोदास अतिथिग्व (सुदासपिता, कांही लोकांच्या मतानें (सुदासपूर्वज), भरद्वाज (दिवोदासपुरोहित); पायु, रजि, सुमिळह, साप्य, पेरुक, पुरुणीथशातवनेय (भरद्वाजकुलोत्पन्न). पारावत, बृबु, बृसय, प्रतर्दन (भरद्वाजाशीं अनिश्चितसंबंध); तुजि, तर्य, पुरय, श्रुतवित् , राम, दशद्यु, वेन, मायव (भरद्वाजोल्लिखित); वेनसंबंध- पार्थ्य, आस्त्रबुध्न (वेनाशी अनिश्चितसंबंध); भरद्वाज संबंध-पुरुपंथा (भरद्वाजाचा आश्रयदाता).
दिवोदासंबंध.- प्रस्तोक, सार्ज्जय (दिवोदासाची दुसरीं नांवे); सृंजय (दिवोदासाशी निकट संबंध); श्वैक्न (सृंजयाशी संबंध). गुंगु (अतिथिग्वमित्र). तूर्वयाण (अतिथिग्वशत्रु). आयु, कुत्स, श्वैत्रेय (कुत्सपुत्र), उशनस् काव्य, आर्जुनेय, श्रुतर्य (अतिथिग्व सहोच्चारित).
वघ्र्यश्व, देवव्रत्, पिजवन (सुदासाचे पूर्वज); पैजवन, दैववात, दैवोदासि (सुदासाचीं पैतृकनांवे); सहदेव (सुदासाचा साहाय्यक).
सहदेवसंबंध.- भयमान, ॠज्राश्व, अम्बरीष (सहदेव बंधु); अम्बरीषसंबंध.- सुराधस् , (अम्बरीषसहोच्चारित); सोमक साहदेव्य (सहदेवपुत्र); नारद (सहदेवगुरु); वघ्र्यश्वसंबंध.- सुमित्र वाघ्र्ययाश्व.
वर उल्लेख केलेल्या व्यक्तींपैकी सुदासाशी समकालीन व्यक्ती कोणत्या आणि सुदासानंतरच्या व्यक्ती कोणत्या हें समजणें शक्य आहे.
दाशराज्ञ युध्दांत कोणत्या व्यक्तीचा संबंध आला याचें ज्ञान उपयोगाचें आहे. त्या व्यक्तीशी आणखी कोणाचा संबंध आला हें कळलें म्हणजे दाशराज्ञ युध्दाशीं समकालीन अशा व्यक्तींची यादी मिळेल.
जी सूक्ते या व्यक्तीचा निर्देश करीत असतील ती युध्दांशीं फार तर समकालीन, पण बहुतकरुन युध्दोत्तरकालीन होत. या दृष्टीनें युध्दोत्तर वाङमंय आपणांस काढतां येतें.
पुढील कोष्टकांवरुन असे कळून येईल कीं, बहुतेक ॠग्वेद दाशराज्ञ युध्दानंतरचा होय असें सिद्ध करतां येतें.
पुराणातील राजांच्या पिढयांची यादी तपासली असतां, आपणांस असें दिसेल की, सुदास हा भारती युध्दाच्या कित्येक पिढ्या अगोदर आणि दाशरथी रामाच्या नंतर झाला होता. म्हणजे वैदिक वाङंमय अधिकच श्रीरामचंद्रानंतरचें होय.