प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग
प्रकरण ३ रें
असुरराष्ट्रसंस्थापनेच्या नंतरच्या इतिहासार्थ वेदावलोकन.
सूक्तांची युध्दोत्तरता आणि ती जाणण्यासाठी उपयोगी पडणा-या व्यक्ती.- ॠग्वेदमंत्रंचा दाशराज्ञ युध्दाशीं संबंध जाणण्यासाठी ज्या ज्या व्यक्तीच्या उल्लेखांच्या साहाय्यानें तो संबंध आपण तपासणार त्या व्यक्तीकडे लक्ष दिलें पाहिजे. व्यक्तीचा दाशराज्ञ युध्दाशी संबंध दिसून आला म्हणजे त्या व्यक्तीचा, ज्या सूक्तांत त्यांचा उल्लेख आला आहे त्या सूक्तांचे दाशराज्ञ युध्दाशीं पूर्वापरत्व काढण्याच्या कामी उपयोग होईल. ह्या व्यक्ती, त्यांची दाशराज्ञ युध्दाशीं पूर्वोत्तरता, आणि त्यावरुन सूक्तांच्या पूर्वोत्तरते वर पडणारा प्रकाश येणेंप्रमाणें आहे.
अं शु:- (८.५,२६). तुग्र प्रियमेध, उपस्तुत, शिंजार यांच्यासह उल्लेख. काल अनिश्चित तथापि अंशूचा उल्लेख सूक्तकाल निश्रयास अनवश्य. तुग्राच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तरकालीन. तुग्र पहा.
अ क्ष:- (८.४६,२४). सायणमताप्रमाणें व्यक्ति. नहुषसमकालीन. पृथुश्रवस् यांच्या दानस्तुतीत उल्लेख. नहुषसमकालीन असल्यामुळें सुदासोत्तर अक्षाबरोबर अरट्वाचा उल्लेख आहे.
अ ग स्त्य:- (७.३३,१०). वसिष्ठ आणि अगस्त्य मित्रावरुणाचे मुलगे. वसिष्ठाचा सुदासाशीं पौरोहित्यसंबंध. तेव्हां अगस्त्याचा उल्लेख असलेली (१.११७; १७०; १७९; १८०; १८४; ७.३३; ८.५; १०.६०). सूक्ते उत्तरकालीनच.
अ ग्रु:- (४.३०,१६). कुमारीपुत्र. सूक्तांत यदुतुर्वशांचा उल्लेख असल्यामुळे सूक्त उत्तरकालीन. व्यक्तीचा प्रत्यक्ष संबंध नाही.
अ घा श्व:- (१.११६,६). हा पैद्व होता. पेदुसंबंध पहा. दिवोदासाच्या उल्लेखामुळें सूक्त उत्तरकालीन.
अ जा स:- (७.१८,१९). सुदासशत्रू. दाशराज्ञ युध्दांत शरण आल्यावर यांनीं इंद्राला अश्वशिरांचा बलि अर्पण केला, सूक्त उत्तरकालीन.
अ ति थि ग्व:- दिवोदासाचें नांव. यांचा उल्लेख असलेली (१.५१; ५३; ११२; १२३; २.१४; ४.२६; ६.१८; २६; ४७; ७.१९; ८.५३; १०.४८) सूक्तें उत्तर.
अ त्क:- (१०.४९,५). अत्क व कुत्स यांचे इंद्रानें रक्षण केलें; अत्क कुस्ससमकालीन असावा. सायण अत्क ही व्यक्तिं मानीत नाहीं, कुत्सोल्लेखामुळें सूक्त उत्तर.
अ त्रि:- (५.८६,१). प्रियमेध, कण्व, गौतम, कक्षी, वान यांच्यासह उल्लेख. पांचवे मंडल आत्रेय असून त्यांतील सूक्तद्रष्ठे अत्रिकुलोत्पन्न आहेत. प्रत्यक्ष अत्रीच्या नांवावर असलेल्या सूक्तांत (५.८६) तो त्रिताचा उल्लेख करतो. त्रित पहा. अत्रीचा उल्लेख असणारीं सूक्तें (१.४५; ११८; १३९; १८३; ५.४१; ८.५; १०.१४३; १५०) उत्तरकालीन.
अ ध्रि गु:- (१.१२२,२). भुज्यूसह उल्लेख. अश्वीनीं भुज्यू चेंव अध्रिगूचें रक्षण केलें. अध्रिगु भुज्युसमकालीन असावा. भुज्यु पहा. अध्रिगूचा आणखी उल्लेख दशग्वासह (८.१२,२) या सूक्तांत आहे.
अ नु:- (७.१८,१४). सुदासशत्रु. इंद्रानें सुदासाकरितां अनु, द्रुह्यु यांचा वध केला. अनूचा आणखी उल्लेख असलेले सूक्त (८.१०) उत्तर.
अ पा ला:- (८.९१,७). अनुक्रमणीप्रमाणें अत्रिकन्या. अत्रि पहा.
अ प्र वा न:- (८.१०२,४), और्व भृगूसह उल्लेख. सूक्त द्रष्टा प्रयोग ह्मणतो, 'और्वभृगु, अप्रवान याप्रमाणें मी अग्नीला बोलावतो,' अप्रवान भृगुसमकालीन असावा. भृगु पहा. अप्रवान याचा आणखी उल्लेख (४.७,१) या ठिकाणीं आहे.
अ भ्या व र्ती चा य मा न:- (६.२७,८). पृथूंचा राजा. याला पार्थव म्हटलें आहे, पृथू हे सुदाससहकारी होते. अभ्यावर्ती चायमान दाशराज्ञ युध्दांत मारला गेला (७.१८,८).
अं ब री ष:- (१.१००,१७) वृषागिरपुत्र. ॠज्राश्व, सहदेव, भयमान व सुराधस् हे वृषागिरपुत्र होते. ॠज्राश्व व वार्षागिर पहा.
अ या स्य:- (१०.१३८,४). कुत्स, ॠजिश्वन् यांचा उल्लेख असलेल्या सूक्तांत उल्लेख. अयास्याचा आणखी उल्लेख (१.६२; ८.६२; ९.४४; १०.६७; १०.८). या सूक्तांत आहे. परंतु तो व्यक्तिवाचक नाही. याचा उल्लेख जुन्या मंडळांतून येत नसल्यामुळे हा फारच उत्तरकालीन असावा.
अ र ट्व:- (८.४६,२७).अक्षाबरोबर उल्लेख. अक्ष पहा.
अ र्च ना न स् :- (५.६४,७). अनुक्रमणीप्रमाणें अत्रिपुत्र; व रथवीति दार्भ्य याचा पुरोहित. दार्भ्य पहा.
अ र्जू न:- (१.१२२,५). कुत्स पिता. कुत्साला आर्जुनेय म्हटलें आहे. अर्जुनाचा उल्लेख कुत्सामार्फतच आला आहे. सुक्त उत्तरकालीन.
अ र्ण:- (४.१९,६). इंद्रानें तुर्वशाकरितां सरयू नदीवर अर्णाचा पराभव केला. सूक्त उत्तरकालीन.
अ लि ना स:- (७.१८,७). सुदासशत्रु. सूक्त सुदासोल्लेखामुळें उत्तरकालीन.
अ व त्सा र:- (५.४४,१०). क्षत्र, मनस्, एवावद, यजत सध्रि, अवत्सार यांचा एकत्र उल्लेख. कदाचित् समकालीन असावे. सूक्ताचा द्रष्टा अवत्सारच असून तो ॠचा १२ मध्यें सदापृण, बाहुवृक्त, श्रुतवित् , तर्य यांचा उल्लेख करतो; व ॠचा १३ मध्यें सुतंभराला आपला यागनिर्वाहक समजतो. यावरुन सुतंभरहि याचा समकालीन असावा. सुतंभरसंबंध पहा. सूक्त उत्तरकालीन.