प्रस्तावनाखंड : विभाग तिसरा. बुद्धपूर्वजग

प्रकरण ६ वें
ब्राह्मण्याचा इतिहास

गोत्रें आणि वेदाध्याय - निरनिराळया वेदांच्या  अध्यायी मंडळींच्या गोत्राची यादी आपण पाहूं लागलों म्हणजें आपणास असें आढळून येईल की एकाच गोत्राची मंडळी ॠग्वेदी आहेत व यजुर्वेदीहि आहेत. ॠग्वेदी मंडळींत यजुर्वेद्यांपेक्षा कांही गोत्रे मित्र आहेत हे खरें पण अल्पांची संख्या फार नाही. यजुर्वेदी मंडळांच्या निरनिराळया शाखांचे आणि सूत्रांचे अध्यायी घेतले तर आपणांस असें दिसून येईल कीं, निरनिराळया सूत्रांस सामान्य अशीच गोत्रें अधिक आहेत. सूत्रविशिष्ट गोत्र असल्यास थोडकी, आश्वद्रष्टया सूत्रे ॠग्वेदी आणि सत्याषाढ सूत्री यजुर्वेदी आणि बौधायन सूत्री कृष्ण यजुर्वेदी गोत्रांची आपण तुलना करूं आणि काय दिसतें तें पाहू.

अध्वर्यु गोत्रांपैकी बौधायनसूत्री असलेलीं पण सत्याषाढ सूत्री नसलेली गोत्रें येणेंप्रमाणेः-

अपास्य, औचभ्य, गौतम. कौडिण्य तुथ्य, पतंजलि, माठर, मित्रयुव, मौक, मौन, यास्क, रजतवाह, रेभ, वाधूल, वीतहव्य.

सत्याषाढसूची मंडळींत असलेलीं पण बौधायान सूत्री मंडळींत नसलेलीं गोत्रें-

अज, आंगिरस, आजमीह्ळ, उपनीति, उपमन्यु, ऊर्जयन, कण्व, कुत्स, तंतु, धनंजय, निलंदिन, पदंजल, बभ्रु, बौद्धयण, वुसमिपत्, वैद, भद्रण, मद्रण, मषण, मधुच्छेंद, मुद्गल, रथितर, रेफ, वत्सावन, सावतार्य, वाच्यायार्न, वामरथ्य, वारकि, विरूप, विष्णुवृद्ध, शठ, सत्यकाम्य,सात्यकि, हरित.

दोघांनां समान्यपणे नांवात प्रययात्मक भेद असलेलीं, अवट, आवट; कश्यप, काश्यप; भरद्वाज, भारद्वाज; भूयस, भूयसी; शुनः शुनक; ही होत.

हौत्रसंप्रदाय आणि दोन अध्वर्यु संप्रदाय यांस सामान्य  अशा गोत्रांची यादी केली असतां ती बरीच मोठी होईल.

अगस्ति, अघमर्पण, अत्रि, अष्टक, अग्निवेश्य, आर्ष्टिपण, ॠक्ष, कत, कपि,कश्यप, कामकायन,कल,कुशिक, गर्ग, गविष्ठिर, विफित, तंडि, पराशर, पूतिमाप, पूरण, भरद्वाज, मनु, वत्स, वामदेव, वासिष्ठ, शांडिल, शुंग, शैशिर, श्रौमत, संकृति इत्यादि नांवे आढळून येतात.

 अव्वर्यु गोत्रें बौधायनपरंपरा / अव्वर्यु सत्याषाढपरंपरा /
हौत्र गोत्रें आश्व.परंपरा


ब्राह्मणेतिहासामध्यें प्रथमतः सूक्तकार म्हणून नांवाजलेले असे जे मोठमोठे ॠषी होऊन गेले ते विशिष्ट प्रवरांत कोंबण्याची खटपट कशी झाली हें मागे दिलेल्या यादींवरून लक्षात आलेंच असेल. पुढे अनेक आडनांवांचे म्हणजे अनेक गोत्रांतले असे जे ॠषी होऊन गेले ते देखील कोणत्याना कोणत्या तरी प्रवरांत घुसविण्याचा किंवा त्यांचा कोणत्यातरी प्राचीन ॠषींशी संबंध जोडण्याचा प्रयत्न झालाच. या सर्वांचा इतिहास देणें म्हणजे आजची सर्वच गोत्रें व त्यांचे प्रवर यांची यादी देणें होईल. पण तितका प्रयत्न आपणास अनवश्य आहे. उदाहरणासाठी एखादी यादी दिली म्हणजे झालें. येथें कात्यायनांची म्हणजें त्या शाखेच्या गोत्रांची व प्रवरांची त्यांच्या सूत्राप्रमाणें यादीं देतो. आज ही शाखा संख्येनें फारशी मोठी नाहीं. हल्ली कास्त या नांवाने ओळखिले जाणारे ब्राह्मण आपण कात्यायन सूत्री आहो असें म्हणवितात.