प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ३ रें.
इराणचें सत्तावर्धन
स्फुट इतिहासाचा आरंभ - शॉल्मानीझर राजाच्या वेळीं असुरी लोकांनीं ख्रिस्तपूर्व ८३६ च्या सुमारास इराणीपासून भिन्न लोक व कांहीं मीड लोक यांनां जिंकलें. मीडियामध्यें असुरी सत्ता ख्रि. पू. ७१५ मध्यें शिखरास पोहोंचली; व ख्रि. पू. ६२६ पर्यंत तिनें टिकाव धरला. असुर-बनी-पाल याच्या अखेरीच्या वर्षांत स्वतंत्र मीड लोकांचें राज्य स्थापन झालें, आणि त्या कालापासून इराणच्या स्वतंत्र अस्तित्वास प्रारंभ झाला असें म्हणतां येईल.