प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ४ थें.
ग्रीक संस्कृतीची व्यापकता.
ग्रीकेतर लोकांवर ग्रीक संस्कृतीचा परिणाम - ग्रीक संस्कृतीनें अलेक्झांडरच्या विजयामुळें भूमध्यसमुद्रापासून हिंदुस्थानापर्यंतचा टापू आपल्या ताब्यांत आणला, व व्यापार व दळणवळणविषयक सर्व गोष्टी आपल्या हस्तगत करून घेतल्या. यामुळें ग्रीक संस्कृतीचा त्या देशावर व त्याचप्रमाणें रोमन अंमलाखालीं आलेल्या पश्चिमेंतील देशांवर काय परिणाम झाला हें आपण पाहूं.