प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
सयाममधील बौद्धसंप्रदाय - इसवी सनाच्या सातव्या शतकानंतर ब्रह्मी लोकांनीं सयाममध्यें बौद्धसंप्रदायाचा प्रसार केला. सयाममध्यें या संप्रदायाचा प्रवेश हीनयान पंथामार्फत झाला व अद्यापीहि त्याच पंथाचें तेथें प्राबल्य आहे. येथील राजाची या संप्रदायावर कृपादृष्टि आहे. धर्माधिका-याची नेमणूक जरी राजाकडूनच होत असते, तरी राजा त्यास सन्मानपूर्वक वागवितो. प्रत्येक वर्षीं तो भिक्षूंना पोषाख वगैरे देणग्या देतो. येथील बौद्धसंप्रदायाचें स्वरूप शुद्ध नाहीं. इतर पंथांच्या चालीरीती या संप्रदायांत शिरलेल्या आहेत.