प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.

ललितविस्तराचें चांदोरकरांनीं केलेलें चिकित्सक परीक्षण - ललितविस्तरापासून निराळा पुरावा गोळा करून तो पुढें मांडण्याची खटपट धुळ्याच्या रा चांदोरकरांनीं केली आहे ती येथें देतों.

गौतमाच्या चरित्रांत व त्याविषयींच्या समजुतींत इतकी कांहीं असंबद्धता भरली आहे कीं, गौतमबुद्ध नावाची वस्तुतः कोणी व्यक्ति नसून तें चरित्र म्हणजे एक सूर्योत्प्रेक्षाच वर्णिलेली आहे असें सेनार्ट नांवाच्या एका ग्रंथकाराने आपलें मत दिलें आहे.