प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ८ वें.
बुद्धाचें चरित्र.
वारांचा उल्लेख व त्याचें ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व.- पांचव्या शतकापूर्वीं, कोणत्याहि प्रसंगाचा काळ देतांना वार लिहिण्याची हिंदुस्थानांत रीति नसल्यामुळें, ५ व्या व ८ व्या शतकाच्या दरम्यान बहुधा कोणीतरी गणित करून या तिथीचे वार लिहिले असावे. परंतु एवढ्याच कारणावरून बिगंडेट्सनें आपल्या भाषांतरांत दिलेल्या तिथीचें ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व बिलकुल कमी होत नाहीं. कारण बुद्धाच्या आयुष्यांतील प्रत्येक प्रसंगासंबंधीं तिथिवारनक्षत्रादि सर्वच गोष्टी मागाहून गणित करून कोणीं लिहिल्या असणें असंभवनीय असलयामुळें, तशी शंका देखील घेण्याचें कांहींच कारण दिसत नाहीं [इं. अँ. पु. ४३].