प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण ९ वें.
भारती युद्धांतापासून चंद्रगुप्तापर्यंत राजकीय इतिहास.
प्रद्योतांची प्राचीनता ? - प्रद्योत घराण्यांतील राजे शैशुनाग घराण्यांतील राजांच्या पूर्वींचे आहेत ही पुराणांतील माहिती चुकीची आहे. कारण कीं, हिंदु बौद्ध आणि जैन ह्या सर्व दंतकथांवरून प्रद्योत हा बुद्धाचा आणि म्हणून बिंबिसार ह्याचा समकालीन होता असें एकच अनुमान निघतें. बिंबिसार आणि उदयन हे एकेच दिवशीं जन्मले अशी चिनी बौद्ध दंतकथेवरून माहिती सांपडते. म्हणून (चण्ड) प्रद्योत, उदयन आणि बिंबिसार हे बुद्धाचे समकालीन होते असें ठरविण्यास हरकत नाहीं.