प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १६ वें.
रोमन-ग्रीक साम्राज्याचा इतिहास व पश्चिमेकडील साम्राज्याची स्थापना.

पूर्वसाम्राज्यांतील राजघराणीं. - प्रथम ऐतिहासिक कथासूत्र लक्षांत येण्यासाठीं निरनिराळ्या राज्य कर्त्या घराण्यांची यादी देतों.

१ काँ न्स्टं टि नि य न घ रा णें.- इ. स. ३२४-३६३. बादशहाः [घराण्याचा संस्थापक, काँन्स्टंटिनस १ ला., ३०५-३०६]

काँन्स्टंटाईन १ ला [३०५-३०६, यापुढें संपूर्ण बादशहा ], ३२४-३३७.

पश्चिमेस - काँन्स्टंटाईन २ रा. ३३७-३४०; कॉन्स्टन्स ३३७-३५०

पूर्वेस- काँन्स्टंटिनस २ रा. ३३७-
  संपूर्ण बादशहाः काँन्स्टंटिनस २ रा. ३५०-३६१; जुलियन, ३६१-३६३.

अंतर्घराणें.-जोव्हियन ३६३-३६४.

  २. व्हॅलेन्शिनियनियन घराणें.- इ. स. ३६४-३९२ बादशहाः

पश्चिमेस- व्हॅलेन्शिनियन १ ला. ३६४-३७५; ग्रॅशियन, ३६७-३८३; व्हॅलेन्शियन २ रा., ३७५-३९२ पूर्वेस- व्हॅलेन्स, ३६५-३७८ [थिओडोशियन १ ला ३७९-३९२.]

३. थि ओ डो शि य न घ रा णें.- इ. स. ३९२-४५७ बादशहाः थिओडोशियन १ ला. [३७९], ३९२-३९५.

पूर्वेस-अर्केडियस, ३९५-४०८; थिओडोशियस २ रा.,
४०८-४५०; मार्सियन, ४५०-४५७.
 
पश्चिमेस- ऑनोरियस, ३९५-४२३; काँन्स्टंटियस ३ रा., ४२२; व्हॅलेन्शिनियन ३ रा., ४२५-४५५; (घराण्याबाहेरचे) मॅक्सिमस, ४५५; अँव्हिटस ४५५-४५६.

४. लि ओ ना इ न घ रा णें.- इ. स. ४५७-५१८. बादशहाः
पूर्वेस- लिओ १ ला., ४५७-४७४; लिओ २ रा., ४७४; झेनो, ४७४-४९१; अँनॅस्टॅशियस १ ला., ४९१-५१८

पश्चिमेस- घराण्याबाहेरचे. मेजोरियन, ४७-४६१; सेव्हेरस, ४६१-४६५; [लिओ १ ला, संपूर्ण बादशहा ४६५-४६७]; अँथेमियस ४६७-४७२; ऑलिब्रियस;, ४७२;, ग्लिसेरियस, ४७३-४७४; जुलियस नेपोस, ४७४-४८० [अपहारी रोम्युलस ऑगस्टुलस, ४७५-४७६].

  ५. ज स्टि नि य नि य न घराणें.- इ. स. ५१८-६०२ बादशहाः जस्टिन १ला, ५१८-५२७; जस्टिनियन १ ला., ५२७-५६५; जस्टिन २रा., ५६५-५७८, टायबेरियस २ रा ५७८-५८२ मॉरिस, ५८२-६०२.
 
अंतर्घराणें.- फोकास, ६०२-६१०.

६ हे -या क्लि य न घ रा णें.- इ. स. ६१०-७११. बादशहाः हे-याक्लियस, ६१०-६४१; कॉन्स्टंटाईन ३ रा. ६४१; हे-याक्लेओनस; ६४१-६४२; कॉन्स्टन्स २ रा, ६४२-६६८; कॉन्स्टंटाईन ४ था. (पोगोनॅटस) ६६८-६८५; जस्टिनियन २ रा. (-हिनॉट्मेटस), ६८५-६९५; (घराण्याबाहेरचे) लिआँटिस ६९५-६९८ आणि टायबेरियस ३ रा. (अँप्शिमर) ६९८-७०५; जस्टिनियन २ रा. (पुनस्थापित) ७०५-७११.

अंतर्घराणें.- फिलिप बार्डानेस ७११-७१३; अँनॅस्टॅसियस २ रा, ७१३-७१६. थिओडोशियस ३ रा, ७१६-७१७,

७ इ सौ रि य न (सि रि य न) घ रा णें.- इ. स. ७१७-८०२ बादशहाः लिओ ३रा. ७१७-७४० (ऊर्फ -४१); कॉन्स्टंटाईन ५ वा. (कोप्रोनिमस), ७४०-७७५, लिओ ४ था. (खाझार), ७७५-७८०; कॉन्स्टंटाईन ६ वा. ७८०-७९७; इरेने ७९७-८०२.

अंतर्घराणें.- निसेफोरस १ ला ८०२-८११; (स्टौरॅशियस( (निसेफोरसचा मुलगा), ८११; मिचेल १ला. (-हंगाबे, स्टौरॅशियसचा सासरा) ८११-८१३; लिओ ५ वा. (अमेंनियन), ८१३-८२०.

८ फ्रि जि य न किं वा अँ मो रि य न घ रा णें.- इ. स. ८२०-८६७ बादशहाः मिचेल २ रा [चोचरा], ८२०-८२९. थिओफिलस, ८२९-८४२; मिचेल ३ रा. [दारूडा], ८४२-८६७.

९ मॅ से डो नि य न घ रा णें.- इ. स. ८६७-१०५७. बादशहाः बेसिल १ ला. [मॅसिडोनियन], ८६७-८८६; लिओ ६ वा (तत्त्वज्ञानी) आणि अलेक्झांडर, ८८६-९१२; कॉस्टंटाईन ७ वा. [पॉर्फिरोजेनेटॉस], ९१२-९५९; रो-मॅनस १ ला [लेकॅमेनस] ९२०-९४४; रोमॅनस २ रा. ९५९-९६३; बेसिल २ रा [बल्गॅरोक्टोनस आणि कॉन्स्टंटाईन) ८ वा, ९६३-१०२५; [घराण्याबाहेरचे निसेफोरस २रा [फोकास], ९६३-९६९, आणि जॉन झिमिसेस, ९६९-९७६; कॉस्टंटाईन ८ वा, एकटा, १०२५-१०२८; रोमॅनस ३ रा. [अर्गिरॉस], १०२८-१०३४; मिचेल ४ था. [पॅफ्लॅगोनियन], १०३४-१०४१ मिचेल ५ वा [कॅलॅफेट्स], १०४१-१०४२; कॉन्स्टंटाईन ९ वा. [मोनोमॅकस]. १०४२-१०५४; थिओडोरा, १०५४-१०५६; मिचेल, ६ वा, [स्ट्रॅटिओटिकस], १०५६-१०५७.

अंतर्घराणें.- आयझॅक १ ला. [काम्रेनस], १०५७-१०५९; कॉन्स्टंटाईन १० वा [डयुकस]१०५९-१०६७; मिचेल ७ वा [पॅरापिनॅसेस], अँड्रोनिकस आणि कान्स्टंटाईन ११ वा, १०६७; रोमॅनस ४ था [डायोजेनेस], १०६७-१०७१; मिचेल ७ वा, एकटा, १०७१-१०७८. निसेफोरस ३ रा, (बोटॅनेइ-अँटेस) १०७८-१०८१.

१० कॉ स्रे नि य न घ रा णें.- इ. स. १०८१-१२०४. बादशहाः अलेग्झियस १ ला. [आयझॅक १ ला. याचा पुतण्या], १०८१-१११८; जॉन २ रा, १११८-११४३; मॅनुएल १ला, ११४३-११८०; अलेग्झियस २ रा, ११८०-११८३; अँड्रोनिकस १ ला ११८३-११८५; आयझॅक २ रा [एंजेलस], ११८५-११९५ अँलेग्झियस ३ रा. [एंजेलस], ११९५-१२०३; आयझॅक २ रा आणि अलेग्झियस ४ था १२०३-१२०४.

अंतर्घराणें- अँलेग्झियस ५ वा, (मुर्तझुफ्लस) १२०४. कॉन्स्टंटिनोपलचा पाडाव व साम्राज्याचें फ्रँक व व्हेनेशियन लोकांनीं केलेलें विच्छेदन, इ .स. १२०४-१२०५.

११ लॅ स्कॅ रि ड घ रा णें.- १२०६-१२५९. बादशहाः थिओडोर १ ला [लॅस्कॅरिस,] १२०६-१२२२; जॉन ३ रा. [वटटझेस किंवा बटटसेस] १२२२-१२५४; थिओडोर २ रा. [लॅस्कॅरिस]. १२५४-१२५९.

१२. पॅ लि ओ लॉ जि य न घ रा णें.- इ. स. १२५९-१४५३ बादशहाः मिचेल ८ वा. [पॅलिओलोगस], १५५९-१२८२; अँड्रोनिकस २ रा. [थोरला]. १२८२-१३२८; अँड्रोनिकस ३ रा. [धाकटा]; १३२८-१३४१; जॉन ५ वा, १३४१-१३९१; [घराण्याबाहेरचे], जॉन (कँटाकुझेनस); १३४७-१३५५; मॅनुएल २ रा, १३९१-१४२५; जॉन ६ वा, १४२५-१४४८; कॉन्स्टंटाईन ११ वा किंवा १२ वा. [ड्रॅगॅसेस] १४४८-१४५३.