प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १९ वें.
यूरोपांतील लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास

स्कँडिनेव्हिअन भाषा.- स्कँडिनेव्हियामध्यें जी ट्यूटॉनिक लोकवस्ती आहे ती व स्काँडिनेव्हियामधून गेलेल्या लोकांनीं वस्ती केलेला जो मुलुख आहे तेथील लोक ज्या जवळजवळ सारख्या व नात्याच्या असलेल्या भाषा बोलतात त्यांनां स्कँडिनेव्हिअन भाषा म्हणतात. या भाषांचा प्रदेश खालील प्रमाणें:-

स्वीडन (लॅपलंड व व्हेस्टरवॉटनचे अंतर्भाग खेरीज करून) या ठिकाणीं फिनिश व लॅपिश या भाषा चालतात; पश्चिम व दक्षिण फिनलंडच्या किना-यावरील कांहीं प्रदेश, लगतचीं कांहीं बेटें व आलंड; (एस्थोनिया येथें स्वीडिश बोलतात; डागो, नार्गो इत्यादि एस्थोनिअन बेटांतहि स्वीडिश बोलतात); नॉर्वे (फिन व लॅप लोकांनीं वसलेला भाग खेरीज करून); डेन्मार्क फेरोज, आइसलंड, ग्रीनलंड (येथें डॅनिश फार थोडे लोक बोलतात); श्लेस्विगचा उत्तर भाग; दक्षिण रशियामधील गामल्सव्हेन्स्कवी गांव (डॅगो येथील लोकांनीं हें वसविले); रुनो हें लिव्होनियन बेट मिनेसोटा, इलिन्वा वगैरे उत्तर अमेरिकेंतील स्कँडिनेव्हिअन वसाहती.

  निरनिराळ्या वेळीं स्कँडिनेव्हियन पोटभाषा खालील ठिकाणीं वापरण्यांत होत्याः-

 नॉर्वेजिअन  आयर्लंडचे कांहीं भाग  ८००-१४५०
   उत्तर स्कॉटलंड  (८००-१४५०)
 आइल ऑफ मॅग
 हेब्राइडीज  (८००-१४००)
 शेटलंड बेटें  (८००-१८००)
 ऑर्कनीज  (८००-१८००)
 डॅनिश  श्लेस्विग सगळा, ईशान्य इंग्लंड
 डेनलाख,  (८७५-११७५)
 नॉर्मंडी  (९००-११००)
 स्वीडिश  रशिया  (८६२-१३००)
 आइसलँडिक  ग्रीनलंड  (९८५-१४५०)

ट्यूटॉनिक लोक स्कँडिनेव्हियांत केव्हां वस्तीला आले हे नक्की समजण्यास मार्ग नाहीं. ख्रिस्ती शकाच्या पूर्वींपासून हे लोक स्कँडिनेव्हिआंत आहेत याजबद्दल वाद नाहीं. ख्रि. पू. ५००० या सुमारास ते असावे असें मानण्यास जागा आहे. हें खरें असेल तर स्कँडिनेव्हियन भाषा ७००० वर्षांच्या जुन्या ठरतात. ख्रिस्ती शकाच्या आरंभापासून जुन्या स्कँडिनेव्हियन लोकांच्या भाषेची माहिती आपणांस जुन्या स्कँडिनेव्हियन लोकांच्या भाषेची माहिती आपणांस मिळते. या शकाच्या आरंभाला सदरील भाषा डेन्मार्कमध्यें, स्वीडन आणि नॉर्वे या देशांच्या पुष्कळशा भागांत, आणि फिनलंड व एस्थोनिया येथें पसरली होती. या सर्व विस्तृत क्षेत्रांत जवळ जवळ एकच प्रकारची बोली बोलली जात होती. या एक भाषेंतून पुढें निरनिराळ्या स्कँडिनेव्हिअन पोटभाषा जन्मास आल्या. जुन्या स्कँडिनेव्हियन व इतर भाषा यांचें नातें येणें प्रमाणें:


इ. स. ७००-१००० या काळांत मूळ स्कँडिनेव्हियन भाषा हळूहळू बदलून तिच्यांतून आइसलँडिक, नॉर्वेजिअन, स्वीडिश व डॅनिश या चार पोटभाषा निघाल्या. सुमारें १५३० पूर्वींचें जें या भाषाचें स्वरूप त्याला जुने व तदनंतरचें जे स्वरूप त्याला नवे असें नांव देऊन जुनी आइसलँडिक, नवी आइसलँडिक इ. असे भाषाभेद मानले आहेत.