प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

संयुक्त संस्थानांचा उदय - फ्रेंच सत्तेच्या -हासामुळे पुढें अमेरिकेंत स्वतंत्र राष्ट्रांचा उदय होण्यास आरंभ झाला. इंग्लिश वसाहती व इंग्लंड यांमध्यें वितुष्ट पडलें व तें वाढत जाऊन त्याचें पर्यवसान अमेरिकेच्या स्वातंत्र्यप्राप्त्यर्थ युद्धांत होऊन अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांचें एक तेजस्वी राष्ट्र अस्तित्वांत आलें.