प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

अन्न.- इंडियन लोक बहुतेक मांसाहारी होते. ते लोक हवेतील, पाण्यांतील व जमिनीवरील प्राण्यांची पारध करीत असत. नरमांसभक्षणाचा प्रघात सार्वत्रिक सुरू होता. पण हे निव्वळ मांसाहारी नसून भाजीपाला, फळें व कंद वगैरे वनस्पतीजन्य पदार्थांचा आपल्या आहारांत उपयोग करीत असत. कांहीं सुपीक भागांत हे लोक धान्य पिकवीत असत. शेतीच्या कामीं यांचें कांहीं कौशल्य दिसत नाहीं. शेतीचीं आउतें लांकडाचीं केलेलीं असत. एक जमीन फक्त तीन साल पेरीत असत. बीं टोंकदार काठ्यांनीं पेरीत असत. पॅसिफिक महासागराच्या बाजूच्या उतरणीच्या कांहीं कांहीं भागांत शेतीसाठीं कालव्याच्या पाण्याचा उपयोग करीत असत. एकंदरीत इंडियन लोकांची शेती अगदीं कनिष्ठ दर्जाची होती व त्यांचीं आउतें फार साधी असून तीं लाकडाचीं केलेलीं