प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण २३ वें.
जुन्या संस्कृती व त्यांचें यूरोपीभवन.

इंका लोक :- प्राचीन अखंडपाषाणस्तंभी साम्राज्य जाऊन बराच काळ लोटला होता तरी त्याची स्मृति अजिबात नष्ट झाली नव्हती. त्या वेळच्या पौराणिक कथा इंकांत शिरल्या व त्यांपैकी एक प्रमुख म्हणजे एक दगडी दरवाजावर कोरलेल्या विरकोच स्वरूपी परमेश्वरावताराची कथा होय. विरकोच या नांवाखेरीज कॉन, इल्ला, टिक्सो, पचनचची, पचकमक इत्यादि परमेश्वराचीं गुणदर्शक नामें इंकांनीं पुरातन लोकांकडून घेतलेली दिसतात.