प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण २७ वें.
मानवी आयुष्यक्रमाचा आणि स्वातंत्र्याचा विकास.
पारमार्थिक मतस्वातंत्र्य.- या बाबतींत इतिहास लिहावयाचा झाल्यास तो मोठा मनोरंजक होईल. या बाबतींत इतिहासक्षेत्र मात्र ख्रिस्ती, मुसुलमान आणि बौद्ध जगापुरतेंच आहे. हिंदूंमध्यें पारमार्थिक बाबतींत स्वातंत्र्यास विरोधच नव्हतां. त्यामुळें हिंदु समाजाच्या इतिहासांत या स्वातंत्र्याचा इतिहास महत्त्वाचा नाहीं. यूरोपच्या इतिहासांत हा इतिहास हें एक महत्त्वाचें पान आहे. विचारस्वातंत्र्याच्या इतिहासावर पुढें योग्य स्थलीं मजकूर येईलच.