प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
ऋग्वेदोल्लेख.- ऋग्वेदांतील ऋचांचे संपूर्ण अवलोकन केलें असतां असे आढळून येतें कीं, छंदःशास्त्र मागाहून तयार झाले पण मंत्ररचना चालू असतांच त्या शास्त्राच्या घटनेस सुरुवात झाली होती. निरनिराळ्या छंदांचे पुढें दिल्याप्रमाणे ऋग्वेदांत उल्लेख आले आहेत.
श क्क री छं द.- गायत्रं त्वो गायति शक्करीषु ( १०.७१, ११ ).
अ नु ष्टु भू छं द – अनुष्टुभ मनु चर्चूर्यमाणं (१०, १२४, ९ )
सात छंदांचा उल्लेख – अग्रे [ १ ] र्गायत्र्यभवत सयुग्वा [ २ ] उष्णिहया सविता सं बभूव !
[ ३ ] अनुष्टुभा सोम उक्थैर्महस्वान बृहस्पते [ ४ ] र्वृहतीवाचमावत् ! [ ५ ] विराङ् मित्रावरुणयोरभिश्रीरिंद्रस्य [ ६ ] त्रिष्टुविह भागो अन्हः ! विश्र्वान्देनान्
[ ७] जगत्याविवेश (१०. १३०., ४-५).
त्रिष्टुभ् छंद- त्रिष्टुब् गायत्री छंदांसि सर्वाता (१०.१४, १६).
अर्का: त्रिष्टुभ: सं नवंते ( ९.९७,३५).
त्रैष्टुभेन वाकं (१.१६४,२४).
तीन छंदाचा उल्लेख:- [१] गायत्रे अधि गायत्र-माहितं [२] त्रैष्टुभाद्वा त्रैष्टुभं निरतक्षत |
यद्वा [ ३] जगज्जगत्याहितं पदं य इत्तद्विदुस्ते अमृतत्वमानशु: ( १.१६४,२३).
जगती छंद- जगता सिंधुं दिव्यस्तभायत् (१.१६४,२५)
गायत्री छंद:- गायत्रेण नवीयसा (१.१२,११)
ता गायत्रेपु गायत (१.२१,२)
गायत्रेण समज्यते ( १.१८८,११)
गायत्रैश्र्चर्षणय: (८.१६,९).
येणेंप्रमाणें ऋग्मंत्रांतच शक्वरी, अनुष्टुभ्, गायत्री, उष्णिह्, बृहती, विराट्, त्रिष्टुभ्, जगती, इत्यादि नांवे व अंर्की यासारखे वृत्तवाचक शब्द दिसून येतात. यासंबंधीं प्रारंभापासून वेदकालांतच विकास काय झाला याचा आपण विचार करूं.