प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.       
 
ऋग्मंत्रकालीन सामविज्ञान- इतर वेदांचे संहितीकरण ज्या काळांत झालें त्याच काळांत सामवेदाचेंहि झालें असावें. सामें उत्पन्न होणें व हौत्रवाङमय जमा होत जाणें या क्रिया बरोबरच चालू असाव्यात. कां कीं, संहितीकरण व वर्गीकरण् या क्रिया झाल्या असल्याची सूचना प्रथम पुरूषसूक्तावरून व्यक्त होते. या सूक्तांत ऋचांचा व सामांचा सहोक्तीनें उल्लेख केला असून ती गोष्ट त्यांची बरोबर वाढ होत होती हें दाखविते. सहाव्या मंडळाखेरीज बहुतेक सर्व मंडळातून सामांचें म्हणजे उद्वात्याच्या विद्येचा उल्लेख दिसतो.  सामांचे महत्व हौत्रांतील म्हणजे ऋग्वेदांतील ऋचांतून स्पष्ट दिसत आहे. म्हणजे, ज्या वेळेस अनेक मंत्र तयार होत होते त्या वेळेस त्यांबरोबरच गायनकलेचाहि विकास होत होता. मग औद्वात्र हा स्वतंत्र ऋत्विजाचा विषय म्हणून प्रस्थापित झाला असो अगर नसो  (तसा झाला नसावा असें वाटतें). कदाचित ऋत्विजांमध्यें वर्गीकरण होण्यापूर्वी व होता हाच शब्द सर्व प्रकारच्या ऋत्विजांनां लागत असतांना सामगायन होतृक्रियेमध्यें देखील मोडत असेल. तथापि विद्येचें पृथक्त्व प्रस्थापित झालें होतें हें खास. हें खालील उताऱ्यांवरून कळून येईल.

''हे ऋत्विजहो, अतिबलवान अशा इंद्रासाठीं तुम्ही विस्तृत व (आंगूष्यं) घोषयुक्त असें एक साम (स्तोत्र) तयार करा (१.६२,२) असें (नोधा) ॠषि म्हणत असून, इंद्राविषयीं आपल्या ठिकाणीं असलेल्या पूज्य बुध्दीचें कारण आपले (पूर्वपितर) मूळपुरूष जे आंगिरस त्यांच्या गाई इंद्रानें सोडविल्या असें त्यानें व्यक्त केलें आहे.

गायत्रानें (गायत्र छंदानें) प्रत्येक अर्क (अर्चनसाधनीय मंत्र) तोडला (मापला) जातो. अर्कानें साम विभागिलें जातें 'अर्केण साम प्रतिमिमांते' [.१६४,२४].

हे इंद्रा'नभन्य' [नभोमंडलांत घुमून राहणारें] साम ज्या प्रकारें तुला पसंत [वेत्सि] होईल त्याप्रमाणें [उद्वाता] गातो 'नभन्यं साम गायत्' [.१७३,१].

यज्ञसंबंधी सामगायनामध्यें देव गढून जातात. 'ऋतस्य सामन्रणयंत देवा:' [.१४७,१].

अंगिरसांच्या सामांनी स्तविलेले देव 'अंगिरसां सामभि: [प्रगीतैर्मेत्रै:-सायण] स्तूयमाना देवा:' [.१०७,२].

[कपिंजल] सामगायकांप्रमाणें दोन्ही वाणी-गायत्र व त्रैष्टुभ् गातो'उभे वाचौ वदति सामगा इव गायत्रंच त्रैष्टुभं अनुराजति'[.४३,१].

हे शकुने उद्वात्याप्रमाणें तूं साम गातोस'उद्वातेव शकुने साम गायसि ब्रह्मपुत्र इव सवनेषु शंससि'[.४३,२].

हे बृहस्पते,जे सामापलीकडे कांहीं (रक्षणासाधन) जाणत नाहींत 'ये न पर:साम्नो विदु:' (२.२३,१६).

हे ब्रह्मणस्पते, त्वष्टा सर्व सामांचा कवि (उच्चारणारा व रचणारा)अशा तुला प्रसवला'त्वष्टा साम्न: साम्न:कवि: अजनत्'(.२३,१७).

आम्हांला पूज्य व अभिमत असलेंले साम जाणून (अग्नि) बोलो. 'महत् साम विद्वान प्रेदु वोचत्'(.५,३)
 
जो ऋचांची इच्छा करतो व जो जागृत असतां सामें गायलीं  जातात तो कोण ? (.४४,१४) 'अग्नि: (सामानि यंति' (.४४,१४)

हे मरूत् हो, सामांचें विविध प्रकारें ग्रथन करणाराचें रक्षण करा [सामविप्रं ऋषि अवथ] (.५४,१४)

हे प्रतृद (तृत्सु) हो,तुमचा वसिष्ठ येत आहे- 'प्रतृद व: वसिष्ठ: आगच्छति. त्याचें सुप्रसन्नतेनें स्वागत करा-,एनं सुमनस्यमाना:उपाध्वं. 'तो शस्त्र पठन करणाऱ्याला, सामगान करणाऱ्याला आणि (सोम कुटण्याकरितां) ग्राव्यांनां धारण करतो - 'उक्थभृतं सामभृतं ग्रावाणं विभ्रती' (.३३,१४).

पूजन करणारे कोणी महान् साम पठन करतात 'एके अर्चेंत:माहि साम मन्वत' (.२९,१०),

(इंद्र) गायिलेलें साम ऐको व गाऊं लागो-'गीयमानं साम श्रवण(च) उपगासिषत्' (.८१,५).

सामांनी जसा धर्म तापवितात त्याप्रमाणें इंद्रासाठीं बृहतसाम गायन करा' सामन् धर्मं तपत गिर्वणसे बृहतगायम' (.८९,७).

शुद्ध अशा सामांने शुद्ध अशा इंद्राला (आम्ही) स्तवितों 'शुध्देन साम्ना शुद्धमिद्रं स्तवाम' (.९५,७).

मोठया इंद्रासाठी बृहत् सामाचें गायन करा. 'बृहते इंद्राय बृहत् साम गायत' (.९८,१).

सामगानकुशल ज्ञाता साम (सामगान) करीत येतो- 'विपश्र्चित् सामन्य:सामकृण्वन् एति' (.९६,२२).

हे सोम, लांबून ऐकूं येणाऱ्या सामध्वनीप्रमाणें तुझा सामध्वनि ऐकूं येत आहे. 'परावतो न सामतत्' (.१११,२).

स्तुतिमान् बृहस्पति सामगानानें पूजित होवो-'ॠक्क: बृहस्पति:सामाभि: अर्चतु' [१०.५९,२]

सामगान चालू असतां आसदन करण्यास योग्य असे अन्न तयार करुं—“सामन्नु राये निधिमन्वत्रं करामहे” (१०.५९,२)

निरनिराळया सामांनी युक्त अशा अंगिरसाप्रमाणें- 'विश्र्वरूपा:सामाभि: [युक्ता:] अंगिरसो न' [१०.७८.५]

[हे सूर्यादेवि] तुझ्या रथाच्या घोडयांनां बांधलेल्या दोऱ्या ऋक्सामरूपी होत- 'ते गावौ ऋक्सामाभ्यां अभिहितौ' [१०.८५,११.].

त्या यज्ञापासून ऋक् आणि साम उत्पन्न करिते झाले'तस्मात् यज्ञात् ऋच:सामानि जज्ञिरे' [१०.९०,८.].

याचें [इंद्राचें] साम दुष्प्राप्य आहे.- 'यस्य साम चित् दुष्ठरं' [१०.९३,२.].

तो [इंद्र] आयुधासह सामाकडे येतो-'स हि विद्युता साम वेति'  [१०.९९,२.].

तोच यज्ञनेता,तोच सामगान करणारा आणि तोच शस्त्र पठन करणारा' तमेव यज्ञन्यं सामगाम् उक्थशासं' [१०.१०७,६.].

तो यज्ञरूपी पट विणण्यासाठीं सामरूपी आडवे दोरे करिता झाला--'पुमान ओतवे तसराणि सामानि चक्रु:' [१०.१३०,२].