प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
  
       
एकस्वरी गाण्यापासून सात स्वरांपर्यंत.– अनेक स्वरयुक्त गायन हा बराच पुढचा विकास होय.  त्याच्या अगोदरची पायरी म्हटली म्हणजे एकस्वरयुक्त गाणे.  अशासच इंग्रजीत “मोनोटोनस” म्हणतात आणि आपल्या लौकिक भाषेंत तुच्छता व्यक्त करण्याकरितां त्यास रडगाणें म्हणतात.  त्या प्रकारचें गाणे अगदीं प्रारंभी होतें असे संहितोपनिषद् ब्राह्मणावरुन दिसते.