प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
ग्रीक व अर्वाचीन यूरोपीय संगीताचा संबंध–ग्रीक संगीत हें आधुनिक यूरोपीय संगीताचा पाया आहे. अर्वांचीन यूरोपीय संगीत कलेचा प्राचीन ग्रीक संगीतापासून प्रत्यक्ष विकास झाला नसून प्राचीन ग्रीक संगीतास रुपांतर होतांना दोन निरनिराळया संक्रमणावस्थांतून जावें लागलें. ग्रीक लोकांची प्राथमिक आवस्थेंत संगीतस्वरमालिका अत्यंत संकुचित स्वरूपाची होती, किंवा खरें बोलावयाचें म्हणजे ही स्वरपरंपरा संगीतास लागणात्या सर्व सवरांची बनलेली नसून केवळ सामान्य बोलण्यांत येण-या आवाजांच्या स्वरांचीच बनलेली होती असेंही म्हणतां येईल.
ग्रीक संगीतात शुद्धस्वरयुक्त (डायाटोनिक) शुद्धकोमलस्वरयुक्त, (कोमॅटिक), व प्लतियुक्त (एनहार्मानिक). असे तीन सवरमालिकांचे प्रकार आढळतात. त्यांमध्ये स्वरांतील परस्परापासूनच्या अंतराच्या बाबतींत फरक होताच. ग्रीक पद्धतीच्या चाली अथवा स्वरमालिका किंवा आपण ज्यास राग म्हणतों ते ग्रीक संगीत पद्धतींत अनेक स्वरसमूहांवर बसविलेले असत. या प्रत्येक समूहांतील स्वरांचे परस्परांपासूनचें अंतर एकच असे. पण या निरनिराळया समूहांतील स्वरांत अलिकडील निरनिराळया सप्तकांत ज्याप्रमाणें अंतर असतें त्याप्रमाणें तीव्रतेंत अंतर असे.
यूरोपीयांचे संगीत ग्रीकांपासून आलें, त्याअर्थी त्यांचा संगीतार्थी शब्द जो म्यूझिक त्याची ग्रीकांची कल्पना काय होती हें आपणास जाणलें पाहिजे. ग्रीक लोक म्यूझिक या शब्दांत मनाच्या शिक्षणाचा बराच भाग अंतर्भूत करीत होते असें दिसते.आरिस्टाटलनें आपल्या ''पॉलिटिक्स', या पुस्तकाच्या शिक्षणविषयक अध्यांयांत म्यूझिकच्या अवश्यक्तेविषयीं लिहीलें आहे. त्याचा अर्थ नीट समजण्यास ग्रींकांची म्यूझिाकविषयी व्यापक कल्पना लक्षात घेतली पाहिजे. ''म्यूझिक'' या शब्दाचा अर्थ तरी काय? भावपोषक कला असा अर्थ करावा किवा केवळ नादकाला हा अर्थ करावा या संबंधी मध्ययूरोपांतील शास्त्राज्ञांत होत असलेले तंटे ब्रॉक हाऊसच्या ज्ञानकोशाच्या (१८८५) म्यूझिक वरील लेखांत व्यक्त झाले आहेत.
स्वरशास्त्र तें संगीत अशी आज पाश्चात्य शास्त्रज्ञ कल्पना करतात आणि तें पदार्थविज्ञानशास्त्राशी ध्वनिशास्त्राच्या मार्फत जोडतात. ध्वनिशास्त्राचें स्वतंत्र अस्तित्व १७ व्या शतकापासून सिद्ध झाले आहे.
आजचे पाश्चात्य संगीतज्ञ संगरतशास्त्राचे तीन घटक समजतात. (१) पहिला घटक ताल . (२) दुसरा घटक स्वरांची ऐकमेकांशी अनुरूपता ,जी आपल्या रागांत व्यक्त होते ती आणि (३) तिसरा घटक हार्मनी. हार्मनी म्हणजे काय तें पुढे सांगतो.
साधा ताल म्हणजे ज्यांत केवळ विशिष्ट कालांतराने आघाताकडे लक्ष असते तो. गीत ताल म्हणजे ज्यांत अनेक आघातांच्या एकमेकांशी संबंध पाहून संगीतार्थ पूर्ण व्यक्त करावयाचा असतो तो. तालांचे कावय आणि नृत्य यांपासून स्वातंत्र्य उत्पन्न झालें ते अनुरूप वाद्यें म्हटलीं म्हणजे आपल्या तबल्यासारखी, ड्रम, आणि टम् टम् हीं होत.
पश्चात्य संगीताचा दुसरा घटक म्हटला म्हणजे स्वरांची ऐकमेकांशी अनुरूपता जी आपल्या रागांत दृष्टीस पडते ती होय.
तिसरा घटक म्हटला म्हणजे हार्मनी हा होय. एकेकाळी उत्पादिल्या जाणा-या भिन्न स्वरांची अनुरूपता म्हणजेच हार्मनी होय. हा ज्या अनेक कारणांनी उत्पन्न होतो ती येणें प्रमाणे:
हार्मनीचे दोन प्रकार किंवा कारणे धरतात. पहिला प्रकार साधा हार्मनी. जेव्हां एकच गाणे चालू असतें आणि त्या गाण्यास शोभा आणण्यासाठी कांही दुसरे भिन्न स्वर मधून मधून पूरक म्हणून घालतात त्याला साधा हार्मनी म्हणतात.
हार्मनीचा दुसरा प्रकार म्हटला म्हणजे तो प्रगत हार्मनी होय. हा प्रगत हार्मनी म्हणजेच काडझटरपाइट होय. काउण्टर पाइण्ट हा अधिक विकसित आणि अधिक पांडित्यमय संगीतरचनेचा प्रकार धरतात. ज्या क्रियेनें हा प्रथम उत्पन्न झाला ती क्रिया येणेंप्रमाणे: गीत किंवा चाल वाजविणे चालू असतां मधून मधून शोभा आणण्यासाठी कांही स्वर उत्पन्न करीत; ते स्वर ज्या स्वरांचे उत्पादन चालू असता उत्पन्न करावयाचे त्या स्वरासमोर टिंबे देऊन दाखवित: त्यावरून त्यांस काउंटर पांईट हे नाव पडले. पुढे त्याचा विकास असा झाला की जे स्वर टिंबानी दाखवावयाचे ते स्वर एकत्र करून त्यांतून एकमेंकांशी अनुरूप अशी स्वरयोजना झाली पाहिजे. अशा रीतीने काउंटर पॉईंट म्हणजे सापेक्ष स्वरांची कल्पना सिद्ध झाली.
काउंटर पॉईंटचे दोन महत्वाचे प्रकार म्हटले म्हणजे क्यानन आणि फ्यूग हे होत. काउंटर पांईट केव्हां सुरू झाला. हे खात्रीपुर्वक सांगंता येत नाही. तथापि तो यूरोपिय मध्ययुगांतल्या आरंभीच्या भागांत सुरू होऊन १२ व्या शतकांत बराच पुर्णतेला पोचला होता, असे ब्रॉकं हाऊस म्हणतो. काउंटंर पॉईटंचा उत्कर्षकाल पंधरावे शतक होय उत्कर्षाचे कारण ख्रिस्ती देवळांतील मोठे संगीत लेखक होत यांमध्ये प्रथम डच लोकांनी आणि नंतर इटालियन लोकांनी आपल्या कलेची पराकाष्टा केली.
त्यानंतर जर्मन लोक पुढें आले. त्यांचा विशेष फ्यूगलेखन होय. काउंटर पांईट ही महतवाची कला आहे खरी पण तीचा उत्कर्ष सध्याच्या कालांत फारसा नाही असे ब्रॉक हाऊस म्हणतो. काउंटर पांईटवरील महत्वाचे ग्रथंकार फुक्स, मारपर्ग, पौसुली, मार्टिनी, चेरूविनी हे होत.
ग्रीकांच्या संगीतात हार्मनी नव्हता पण स्वरांची अनुरूपता होती. त्यांचे स्वरसप्तक केवल चार स्वरांचे होतें. त्याला टेट्राकार्ड म्हणत. ते प्रथमत: डायाटोनिक होतें मग क्रोमॅटिक आणि नंतर हार्मोनिक होतें. डायाटोनिक म्हणजे समान अंतरावर असलेल्या सरांचा समूह. हे स्वर बहुधा सर्व शुद्ध असत. म्हणुन यांस शुद्धसवरयक्त असे म्हणता येईल. क्रोमॅटिक म्हणजे शुद्ध व कोमल स्वरयुक्त असा स्वरसमूह. म्हणजे आजच्या बारा स्वरांच्या समूहासारखा. याला शुद्धकोमलयुक्त असें म्हणतां येईल. तिसरा जो एनहार्मानिक समूह त्यामध्यें मध्येंच कोठें तरी दोन स्वरांत मोठें अंतर असे त्यामुळें त्या ठिकाणी उडी मारावी लागे म्हणून त्यास प्लुतियुक्त असें नांव देतां येईल. दोन टेट्राकार्डाचे आजचें अष्टस्वरी सप्तक होतें. टेट्राकार्डपासून मध्ययुगांत हेक्झाकार्ड (षट्स्वरी) तयार झालें आणि त्याच्यानंतर आजचें यूरोपियांचे अष्टस्वरी सप्तक तयार झालें.
पाश्चात्य संगीताचे विभाग गान आणि वादन व्होकल आणि इन्स्टुमेंटल म्यूझिक हे होत. त्यांत गानास अधिक महत्व दिलें जातें. कां की ते प्राचीन असून अधिक भावपूर्ण करतां येते; वादनामध्ये अधिक प्रकार करतां येतात; ते अधिक सप्तकांत आणता येते; आणि स्वरांचा गोडपणा त्यांत मानवी स्वरापेक्षा अधिक आणतां येतो.
संगीताचे पारमार्थिक आणि लौकिक असे वर्गीकरण करीत. पुढे देवालयसंगीत (चर्चम्यूझिक, नाटयसंगीत (स्टेज म्यूझिक) आणि जलसा संगीत (कानसर्ट म्यूझिक) असे वर्गीकरण करू लागले. या प्रकारचे वर्गीकरण म्हणजे केवळ लौकिक नावांनांच शास्त्रीय स्वरूप देणें आहे.
पाश्चात्त्य संगीताचे वाड्:मय बरेच विस्तृत आहे. तथापि पद्धतशीर शास्त्रीय वाड्:मय फार थोडे आहे. क्रमिक पुस्तकें आणि इतिहास असे वर्गीकरण करतां येईल. याविषयी येथे अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही. पाश्चात्य आणि भारतीय संगीताच्या सादृश्यभेदाकडे आतां आपण वळूं.