प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
गण आणि वृत्तें- छंद:शास्त्र म्हणते पद्यरचनेसंबंधाचे शास्त्र.पद्य किंवाकविता साधारणपणें चार ओळींची असते.प्रत्यके ओहीचे जे विभाग पडतात त्यांना शास्त्रीय संज्ञा गण (फूट) अशी आहे. एकेक गण अनेक अवयव अथवा गणांश (सिलेबल्स) मिळून झालेला असतो. गणांतर्गत अवयवांचा म्हणजे गणांशांचा विचार करण्याच्या तीन निरनिराळया पद्धति आहेत.कित्येक भाषांमध्ये गणांतील प्रत्येक अवयवाचा स्वतंत्र विचार करून त्याला नांव देण्याची पद्धति आहे. कांही भाषांमध्ये अवयव प्रत्येक स्वंतत्रपणे किंवा समुच्चयानें विचारांत घेण्याची पद्धति आहे;आणि कांहीं भाषांमध्ये गणांतील आघातयुक्त (ॲक्सेंटेड) गणांश कायतो विचारांत घेण्याची पद्धति आहे. यांपैकी पहिली पद्धति संस्कृत भाषा व संस्कृतप्रमाणे पद्य-रचना ज्यांत होत असते अशा मराठी, तेलुगु व कानडी या भाषांत प्रचलित आहे. दुसरी पद्धति तामिळ भाषेत, आणि तिसरी यूरोपीय भाषांमध्ये आढळते. पहिल्या पद्धतीत प्रत्येक अवयव लघु किंवा गुरू या नांवाने विवक्षिला जातो; दुसऱ्या पद्धतींत नरे किंवा निरई या नांवानें; आणि तिसऱ्या पद्धतींत साघात(ऍक्सेंटेड) किंवा निराघात (ॲक्सेंटेड) या नावांने ओळखला जातो. गणांतील अवयवांची संख्या अमर्यादित नसते; प्रत्येक गण दोन किंवा तीन अवयवांचा असतो. गुरू, नरे किंवा साघात अवयव दर्शविण्याकरितां (ऽ) अशी खूण योजून, आणि लघु, निरई व निराघात अवयव दर्याविण्याकंरितां (।) अशी खूण वापरून छंद:शास्त्रांतील गणांची रचना किती निरनिराळया प्रकारच्या गणांची होऊं शकेल हें पुढील कोष्टकावरून स्पष्ट करून देतां येईल :-
गणांतील अवयव |
गणांची नांवे | |||||
संस्कृत,मराठी, | तामिळ भाषा | यूरोपीयन भाषा | ||||
ऽ ऽ | गग | थेम | स्पाँडी | |||
। ऽ | लग | पुलिम | आयंबस | |||
ऽ । | गल | कुविलं | ट्रोकी | |||
। । | लल | करूविलं | पिऱ्हिक | |||
ऽ ऽ ऽ | मगण | तेमंगइ | मोलोसस | |||
। ऽ ऽ | यग | पुलिमंगइ | बॅकिक | |||
ऽ । ऽ | रगण | कुविलंगइ | क्रेटिक | |||
। । ऽ | सगण | करूविलंगइ | अनापेस्ट | |||
ऽ ऽ । | तगण | तेमंगनी | ॲटिबँकिक | |||
। ऽ । | जगण | पुलिमंगनी | ॲफिब्रॅक | |||
ऽ । । | भगण | कुविलंगनी | डॅक्टिल | |||
। । । | नगण | करूविलंगनी | ट्रायब्रॅक |
तथापि गणाचा विभाग एकेक अवयव असतो असें नाहीं, आणि म्हणून थेम आणि गग हे एकच आहेत असें मानणें चुकींचे आहे. वरील कोष्टकांत गणाचे विभाग दर्शविले आहेत.त्यांत त्यांचे स्वरूप कांहीं असो पण त्यांचे परस्पर साद्दश्य पाहण्यालायक असतें. संस्कृत, तेलुगु आणि कानडी या भाषांतील गणांचा प्रत्यके विभाग एकेकच अवयवाचा झालेला असतो व त्याला गुरू किंवा लघु हे नांव असतें. लघु अक्षर, गुरू अक्षर, आणि निरनिराळे गण यांच्या व्याख्या किंवा वर्णन येथें देण्याची जरूर नाहीं, इतकें सांगितले म्हणजे पुरे कीं, ज्याला अक्षरगण म्हणतात ते संस्कृत,मराठी,तेलुगु व कानडी या भाषांत सारखेच आहेत. येथें एक गोष्ट मात्र लक्षांत घेण्यासारखी आहे कीं,तेलुगु भाषेमध्यें याच गणांपैकी कांहीचे सूर्य, इंद्र आणि चंद्र गण असे जे विभाग पाडतात ते नियमविरूद्ध आहेत असें सकृद्दर्शनीं वाटते; पण वास्तविक त्यामध्यें पूर्ण अर्थ भरलेला आहे. या गणांच्या योगानें कांहीं विशिष्ट प्रकारचीं वृत्तें तयार होतात. त्यासंबंधाने भिमन यानें एक नियमहि दिलेला आहे, परंतु तो केवळ कृत्रिम स्वरूपाचा आहे. तेलुगु भाषेमध्ये सूर्य,इंद्र आणि चंद्र अशी गणांची स्वतंत्र विभागणी असण्याची जरूरी काय असावी याचा उलगडा बरेच दिवस झाला नव्हता. द्राविडी भाषांतील छंद:शास्त्राचा अधिक अभ्यास झाल्यावर हा प्रश्न उलघडला. कानडी भाषेमध्यें ब्रम्हा, विष्णु आणि रूद्र असे तीन मूळ देश्य भाषेतील गण आढळतात, त्यांचे उपर्युक्त तेलुगू भाषेतील सुर्य, इंद्र आणि चंद्र हया तीन गणांशी फार साद्दश्य आहे. कानडींतल्या या गणांनी बनणाऱ्यां वृत्तांचीं तेलुगूतील वृत्तांशी तुलना करिंता त्यांच्या लक्षणांतच नव्हे तर शास्त्रीय नांवांमध्येंहि फार साम्य आहे असे आढळून येतें. यावरून असें अनुमान निघतें की, संस्कृत भाषेचा प्रवेश सदरहू प्रांतांत होण्यापूर्वीच तिकडील मूळ भाषेंमध्ये काहीं एक प्रकारची वृत्तें होतीं व त्यांच्या व्याख्याहि ठरलेल्या होत्या.पुढें संस्कृत भाषेचा प्रसार तिकडे झाल्यावर संस्कृतांतील छंद:शास्त्रीय पारिभाषिक शब्दांत त्या मूळच्या गणांच्या व्याख्या व लक्षणें देण्यात आली. तेलुगू भाषेंतील सुर्य, इंद्र आणि चंद्र या गणांवर अवलंबून असलेल्या वृत्तांची अशीच स्थिती आहे. तात्पर्य सुर्य, इंद्र आणि चंद्र या गणांचा अंतर्भाव संस्कृत छंद:शास्त्रांत होण्याचें कारण त्यांचे मूळ देश्य भाषेंतील वृत्तांचा अंतर्भाव मूळच्या कानडी वृत्तांत व गणांत झालेला आहे.तामिळ भाषेंत गण व वृत्तें हा त्यांचा केवळ एक भाग आहे.
याकरितां तामिळ भाषेंतील छंद:शास्त्राची माहिती असणें जरूर आहे. तामिळ भाषेंतील गणांचे मोजमाप नरे व निरई या भानगडीच्या साधानांनी करितात. तामिळ भाषेंत गणाला सीअर म्हणतात आणि गणांतील अवयवांना असइ म्हणतात. असईचेहि पोटविभाग असतात त्यांना नेदिल, कुरिल व अर्धमात्राइ असें म्हणतात.
नेदिल म्हणजे दीर्घस्वर असलेलें अक्षर; उo की, कू. कुरिल म्हणजे लघुस्वर असलेलें अक्षर; उo की, कु. अर्धमात्राइ म्हणजे स्वरहीन व्यंजन; उo क्, त्, म्.
असईंचे नरे असइ व निरइ असे दोन प्रकार आहेत. द्राविडी गण व वृत्तें यांवरून ठरविलेंली असल्यामुळे त्यांची सविस्तर माहिती येथें देणें जरूर आहे.
नरे असइ म्हणजे :-
(१) एक कुरिल (लघु अक्षर) उ. क, न; किंवा (२) एक लघु अक्षर व त्यानंतर आलेली अर्धमात्राइ उo गम्, नम्: किंवा (३) एक नेदिल (गुरू अक्षर) उo का, ना; किंवा (४) एक गुरू अक्षर व त्यानंतर आलेली अर्धमात्राइ उo काम्, नाम्.
यावरून असें दिसून येतें कीं, नरे म्हणजे एक पूर्ण अक्षर, मग त्याला जोडून अर्धमात्राइ असो किंवा नसो. मात्र नरे कधींहि दोन अक्षरांचा नसतो. तेलुगू परिभाषेप्रमाणें नरे हा लघु किंवा गुरू या दोहोंपैकी कोणीहि असूं शकेल.
परंतु नरेला कोणतेंहि एक लघु अक्षर अधिक जोडलें (गमचें अगम् झालें) कीं त्याला निरइ म्हणतात.
ल। ग। गा । गम् । हे सर्व स्वतंत्र मानल्यास नरे आहेत.
लल । लगन् । लगा । लगान् । यांपैकी प्रत्येक निरई आहे. यावरून निरइ म्हणजे:-
(१) दोन एकत्र असलेंली लघु अक्षरें;उ.लल;किंवा
(२) दोन एकत्र असलेंली लघु अक्षरें व त्यानंतर आलेली अर्धमात्राइ;उ.लगन्;किंवा
(३) एक लघु व एक गुरू अक्षर; उ. लगा: किंवा
(४) एक लघु नंतर एक गुरु अक्षर नंतर एक अर्ध मात्राई; उ. लगान्.
तेलुगू परिभाषेंत निरइला लल किंवा लग यांपैकीं कोणतेंहि नांव योग्य आहे.
तामिळ भाषेंत गणविभागणी करूं लागलों म्हणजे असें दिसून येतें कीं, नरेचा उपयोग कवितेच्या ओळींत जपूनच करावयास पाहिजे. नरे नेहमीं एकावयवी असतो. तो गणाच्या शेवटीं असला म्हणजे गुरू किंवा लघु कोणताहि असूं शकेल. परंतु गणाच्या आरंभी किवा मध्यें नरे हा गुरूच असला पाहिजे; तो लघु कधींच असतां कामा नये. कारण अशा ठिकाणीं लघु असल्यास तो लगेच गणातल्या पुढल्या अक्षरांशी जोडला जाऊन त्याचा दोन अवयवी निरइ बनतो. म्हणून आरंभींचा व मधला नरे गुरूच असला पाहिजे. गणाच्या शेवटीं मात्र नरे गुरू किंवा लघु कोणताहि असूं शकेल. कारण एका गणाचा दुसऱ्या गणाशीं मुळींच संबंध नसतो; म्हणून लघूच्या पुढें कोणतेंहि अक्षर जोडलें जाऊन त्याचा निरइ बनण्याची मुळींच शक्यता नसते.
कवितेच्या प्रत्यके ओळीचा गण हा मुख्य भाग होय. गणाचे अवयव तामिळ भाषेंत मिश्र असतात. तेंलुगु छंद:शास्त्राची तामीळ छंद:शास्त्राशी तुलना करणें दोघांनी समान अशीं चिन्हें ठरविल्याशिवाय शक्य नाहीं. त्याकरितां एक योजना ठरविण्यांत आलेली आहे. निरइ म्हणजे लल किंवा लग. नरे मात्र नेहमीं गुरू असतो.फक्त गणाच्या शेवटीं तो गुरू किंवा लघु कोणताहि चालतो. कांही शुद्ध कानडी व शुद्ध तेलुगु वृत्तांचा व गणांचा विकास कसा झाला हें येथें थोडेंसे स्पष्ट करूं.
तामिळ भाषेंतील अगदीं जुन्या वृत्तांपैकीं अहवल्व हें एक आहे. त्याचे गण थेम, पुलिम, कुविलप्, आणि करूविलम् हे आहेत. परंतु ४ कइ सीअर (गण) यांचाहि त्यांत समावेश होणें शक्य असतें. डॉ.जी.यू. पोपचें मत तसेंच आहे. तो म्हणतो: ''थेम, गण इंग्रजी स्पाँडी किंवा ट्रोकी यांच्या सारखा आहे; आणि पुलिम इंग्रजी अनापेस्ट, ट्रायब्रॅक, बॅचियस् किंवा क्रेटिक यांच्या सारखा आहे. याचप्रमाणें इतर गणांसंबंधानें म्हणतां येईल.
थेम आणि पुलिम गण येणेंप्रमाणें असतात :-
ऽ ऽ, ऽ।,। ऽ ऽ, ॥ ऽ ।, । । ऽ, ॥।.
कानडींतीले ब्रह्मगण म्हणजे यांपैकींच कांहीं असतात; उदाहरणार्थ ऽऽ, ऽ।, ।।।. आणि ॥ऽ.
तेलुगू भाषेंतले सूर्यगण या कानडी गणांपैकींच कांही असतात उदा. ऽ। आणि ।।।.
कुविलम्, करूविलम्,तमंगइ, आणि पुलिमंगइ गण येणे प्रमाणें: ऽ।ऽ, ऽ।।, ।।।।, ।।।ऽ, ।ऽ।।, ।ऽ।ऽ, ऽऽऽ, ऽऽ।, ।ऽऽऽ, ।।ऽऽ, ऽऽ।।, ।।ऽ।,
कांनडीतले विष्णुगण म्हणजेहि वरच्यांपैकींच कांही: उदा. ऽ।ऽ, ऽ।।, ।।।।, ।।।ऽ, ऽऽऽ, ऽऽ।, ।।ऽ।.
तेलगु इंद्रगण म्हणजे कानडीजल्या गणांपैकीं कांही: उदाñ ।।।।, ।।।ऽ, ।।ऽ।, ऽ।।, ऽ।ऽ, ऽऽ।,
याप्रमाणेंच रूद्र गणांची स्थिति आहे. येणेंप्रमाणें अहवल्प हें एकच वृत्त म आणि विलम् सीअर (गण) ज्यांत बहुतकरून असतात आणि कइ सीअर [गण] कधींकधीं असतात अशा कवितेचे सर्व प्रकार व्यक्त करतें.