प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
उत्तरेकडील संगीतपद्धति-दामोदरमिश्राचा संगीतदर्पण.– उत्तरेकडील संगीतपद्धतीवर जहांगीर बादशहाच्या कारकीर्दीत इ.स. १६२५ च्या सुमारास दामोदर मिश्र यानें लिहिलेला संगीतदर्पण या नांवाचा ग्रंथ आहे. या ग्रंथकर्त्यानें आपल्या ग्रंथांत संगीतरत्नाकर या ग्रंथांतील स्वरांसंबंधीच्या प्रकरणांतून बरेच उतारे घेतलेले आहेत. परंतु संगीतरत्नाकराप्रमाणेंच हा ग्रंथ दुर्बोध झालेला आहे. राग या विषयावर दुसऱ्या एका अप्रसिद्ध ग्रंथकाराच्या ग्रंथातून उतारे घेतलेले आहेत. या ग्रंथात निरनिराळया रागांची चित्रें दिलीं आहेत.