प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.

स्वरांच्या किंमती– तेव्हां तिघां पंडितांच्या सात स्वरांचीं प्रमाणे यंत्रसहाय्यानें आपण काढूं म्हणजे झालें.

सा रे ग म प ध नि.

पं. रामामात्याच्या सात स्वरांच्या

लहरी. २४०, २५६, २७०, ३२०, ३६०, ३८८, ४०५

पं. अहोवलाच्या सात

लहारी. २४०, २७०, २८८, ३२०, ३६०, ४०५, ४३२

चतुर पंडिताच्या सात स्वरांच्या

लहरी. २४०, २७०, ३००, ३२०, ३६०, ४०५, ४५०

वरील नादलहरींचीं प्रमाणें तुलनेसाठीं आम्ही घेत आहों; तीं पाश्र्चत्य यंत्राच्या साहाय्यानें आपणांस मिळत आहेत; ती जुन्या ग्रंथांत नव्हती हें स्पष्ट सांगणें भाग आहे. नाहीं तर आमच्या कार्य पंडितांस नादलहरी ठाऊक होत्या काय असा निराळाच वाद उपस्थित व्हावयाचा !

वरील आंकडयांकडे नजर टाकिली असतां असे दिसेल कीं, निरनिराळया कालांतील तीन पंडितांच्या सा, म, प. ह्या तीन स्वरांत पूर्ण साम्य आहे.  रि, ग, ध, नि हीं स्वरनामें जरी एकच असलीं तरी त्यांच्या ध्वनींत स्पष्ट भेद दिसून येत आहे.

ह्यावरुन आपणांस स्पष्ट म्हणतां येईल कीं, पं. रामामात्याचा मुखारी राग, अहोबल पंडिताचा सैधवी राग व चतुर पंडिताचा विलावली राग अगदीं निराळे आहेत.

वरील विवेचनावरुन आपणांस असेंहि स्पष्ट म्हणतां येईली की, तीनहि ग्रंथकारांचे रि, ग, ध, नि हे स्वर नांवाने जरी एकच असले तरी प्रमाणानें ते अगदीं निराळे आहेत व ही गोष्ट आपणांस कळल्यावांचून त्यांचे ग्रंथ आपणांस समजणें अशक्य आहे.