प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
स्वर, ग्राम, मूर्च्छाना आणि तना यांचे सामगायनांत अस्तित्व.– सप्तस्वरास्त्रयोग्रामा मूर्च्छनास्त्वेक विंशाति:तना एकोन पंचाशदित्येतत्स्वरमंडलम् ॥ असा नारदी शिक्षेंत एक श्लोक आहे. त्यावरुन सात स्वर, तीन ग्राम, एकवीस मूर्च्छाना व ४९ ताना इतका सामगायनामध्ये स्वरविस्तार असल्याचे दिसून येते.