प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            

सामेतर संगीत.– वैदिक संगीतापासून उत्तरकालीन संगीताकडे जाण्यासाठी मध्येंच एक प्रश्न विचारांत घेतला पाहिजे आणि तो म्हटला म्हणजे संगीताच्या इतिहासाचे परकीयांच्या परिणामावरुन कालभेद पाडावेत काय ? या प्रश्नांचे विवेचन करण्यासाठी परकीयांच्या संगीतपद्धतीचे भारतीय संगीतावर परिणाम अजमावले पाहिजेत.