प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
त्यागराजाचे समकालीन- गोविंद मारर हा याच काळांतला दक्षिण हिंदुरूथानांतील एंक सुप्रसिद्ध संगीततज्ञ होता. तो संगीतकलच्या दीर्घकालीन परंपरेचे माहेरघर असलेलें जे तंजावर संस्थान तेथला रहीवाशी होता. गोविंद मारर याला षट्काल गोविंद असेही म्हणत असत. कारण तो संगीताची पद्यें षट्कालांत म्हणत असे त्याच्या आणि त्यागराज्याच्या भेटीसंबंधाने एक गोष्ट सांगण्यांत येते. एकदां त्यागराज आणि इतर संगीततज्ञ आपल्या गुरूपाशीं एकत्र बसून 'पतुरावली्' रागांत पल्लवी (कोरस) म्हणत होते. त्यावेळी गोविंदाने आपला स्वत:चा सात तारा आलेला तंबुरा घेऊन ती षट्काल (सेक्स्डुपल) तालांत म्हणून दाखविली तें ऐकून त्ययागराजाला इतकें आश्चर्य वाटलें कीं, त्यानें त्याला गोविंदस्वामी असें नाव दिले व त्याच्या सन्मानार्थ एक नवें पद्य रचिलें.
मुत्तुस्वामी दिक्षीत आणि शामशास्त्री हे दोघे संगीतज्ञ त्यागराजाशीं समकालीन होऊन गेले. यांपैंकी पहिला तिनवेल्ली जिल्हयांतला असून त्याने हिंदी स्वरलेखनाची एक नवीनच पद्धति शोधून काढली. या पद्धतींत प्रत्येक स्वराच्य निरनिराळया विकृति दर्शविण्याकरिता निरनिराळे स्वर वापरले अरहेत. एत्कियापुरम् सुब्राम दीक्षीत हा त्याचा नातू होता. यानेंही तेलगू भाषेंत दक्षिणेकडील संगीतपद्धतीवार एक महत्वाचा ग्रंथ लिहून त्यांत शारगंदेवाचीं तत्वें आधुनिक संगीताला लावण्याचा प्रयत्न केला आहे.