प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
छंदाचें ग्रंथोक्त महत्व.- प्राचीनांनीं ह्या शब्दाची बरींच विवरणें दिलीं आहेत. देव स्वत: यज्ञांतील कृत्यें वृत्तांच्या साहाय्यानेंच करतात; व वृत्तांच्या साहाय्याशिवाय हीं कृत्यें होणें शक्य नाहीं, मग नुसता मनुष्य स्वत: दीक्षित असला तरी वृत्तांच्या मदतीशिवाय हीं कृत्यें कसा करणार; अशा तऱ्हेचे विचारहि व्यक्त झाले आहेत.