प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.                 

रोमन काळांतील भाषाशास्त्राचा अभ्यास- व्याकरणाचा अभ्यास पुढें रोमन लोक करूं लागले.तो अभ्यास त्यांनीं ग्रीक भाषेच्या अभ्यासाबरोबर सुरू केला; व आपलीं व्याकरणें ग्रीक पद्धतीवर बसविलीं. अर्थात् तीं व्याकरणें चुकांनीं भरली. अलेक्झांड्रियामध्ये व्याकरणशास्त्राचा जो विकास झाला त्याची बरोबरी यूरोपांत पुढें बराच काळ झाली नाहीं.मध्ययुगामध्यें लॅटिन शिकण्याकरितां तुटपुंजी व्याकरणें लोक थोडींबहुत तयार करीत. तथापि शास्त्रवृध्दि म्हणजे भाषापृथक्करण या द्दष्टिनें त्यांची किंमत बेताचीच होती.