प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.            
 

हेमचंद्राचे इतर ग्रंथ.- हेमचंद्रानें आपल्या ग्रंथावर स्वत:च शब्दानुशासनबृह्द्वृत्ति नांवाची टीका लिहिली आहे.  या टीकेवर न्यास नांवाची टीका असून न्यासासहित शब्दनुशासनवृह्द्वृत्तीची जर कोणी आवृति काढील तर हिंदुस्थानांतील व्याकरणशास्त्राच्या इतिहासास त्यापासून बरीच मदत होणारी आहे.

याशिवाय आपल्या व्याकरणांतील नियमांची उदाहरणें देणारे व्द्याश्रयमहाकाव्य नांवाचें एक काव्य भट्टिकाव्याच्या धर्तीवर हेमचंद्रानें लिहिलें आहे.