प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.            

हेमचंद्राचा संप्रदाय- हेमचंद्राच्या चारित्रासंबंधानें इतर वैयाकरणांच्या मानानें बरीच माहिती मिळते. ही सर्व माहिती डॉ.बुह्लर यानें' युबेर डास लेबेल डेस जैन मॉचेस हेमचंद्र, विएना १८८९ या जर्मन ग्रंथांत सन १८८९ साली एकत्रित केली आहे.