प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.               
 
सौपद्म व्याकरणावरील टीका व उपग्रंथ.– सौपद्म शाखेच्या व्याकरणावर पद्यनाभदत्तानें स्वत:च सौपद्मपंजिका नांवाची टीका लिहिलेली आहे.  हिच्याखेरीज दुसऱ्याहि कित्येक टीका आहेत.  त्यात विष्णुमिश्राची ‘सौपद्ममकरंद’नांवाची टीका सर्वांत उत्तम आहे.

या शाखेंतील उपग्रंथापैकी, उणादि, धातु व परिभाषा यांवर पद्यनाभदत्तानें स्वत:च ग्रंथ लिहिले आहेत.  परिभाषावृत्तीच्या शेवटीं या ग्रंथकारानें आपण केलेल्या वाङमयसेवेचा इतिहास दिला आहे तो ऐतिहासिक द्दष्टया महत्वाचा आहे.  धातुपाठांत धातुविभाग पाणिनीच्याच धर्तीवर असून त्यावर धातुनिर्णय नांवाची टीका आहे.

सध्याच्या काळात मध्यबंगाल्यात म्हणजे २४ परगण्यांत जेसोर, खुलना व भरतपूर एवढयाच ठिकाणीं या शाखेचा प्रचार आहे.