प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.               

सौपद्म शाखेचें वैशिष्टय.– सौपद्मशाखेचे व्याकरण जें पद्मनाभदत्तानें लिहिलें, त्यांत पाणिनीची कांही सूत्रे, प्रत्याहार व पारिभाषिक संज्ञा शब्दश: जशाच्या तशाच ठेविल्या आहेत.  अर्थात् त्यानें पाणिनीचे बरेचसे नियम सुधारुन त्यांची अधिक पद्धतशीर मांडणी केली आहे व प्रत्येक सूत्राच्या शेवटी स्वत:चे स्पष्टीकरण दिलें आहे.  पद्मनाभदत्तानें बरीचशी पाणिनीचीच परिभाषा वापरली असल्यामुळें पाणिनीच्या परिभाषेंत लिहिलेल्या काव्यावरील व शास्त्रीय विषयांवरील इतर ग्रंथकारांच्या टीका वाचतांना या शाखेच्या लोकांना स्वत:च्या शाखेची परिभाषा विसरावी लागत नाही.