प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.          

सिंहलद्वीपांतील चांद्र संप्रदायाचा प्रचार- चंद्र व्याकरणाचा प्रचार जसा तिबेटमध्यें झाला तसाच तो सिंहलद्विपांतहि झाला. पण तेथें ग्रंथकारापेक्षां पद्धति आणि तत्वेंच पसरलीं असें म्हटलें पाहिजे. वास्तविक तो बौद्ध लोकांचा देश असल्यानें तेथें चांद्र संप्रदायी ग्रंथ सापडावयास पाहिजेत. पंरतु त्याची रचना वरदराजाच्या लघुकौमुदीसारखी असल्यामुळें चंद्र संप्रदायाचा ग्रंथांपेक्षां हा ग्रंथच अधिक लोकप्रिय होऊन ते सर्व ग्रंथ मागें पडले. अशा स्थितींत या संप्रदायाचा आणखी इतिहास सांगता येत नाहीं.