प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.
सारस्वत व्याकरणाचे उपग्रंथ- उणादि किंवा परिभाषा यांजवर या संप्रदायाचे ग्रंथ नाहींत. हर्षकीर्ति यानें धातुपाठ व त्यावर तरंगिणी नांवाची टीका लिहीली आहे. त्याचा काल सुमारें इ.स. १५६० हा आहे. ज्ञानकिर्ति नांवाच्या एका माणसानें 'कृत्' 'तद्वित' वगैरेचीं रूपें व त्यांच्यावरची सारस्वतव्याकरणांतील चर्चा हीं एकत्र केलीं आहेत.माधव नांवाच्या दुसऱ्या एका ग्रंथाकारानें सारस्वत पद्धतीला अनुसरून व्युत्पत्तीचा विचार केला आहे. याचा काल बहुधा इ.स. १६८० हा असावा.
लघुचंद्रिकेखेरीज, कल्याणसरस्वती नावांच्या ग्रंथकारानें एक लघुसारस्वत नांवाचा ग्रंथ लिहिला आहे.