प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             
 
सारस्वत प्रक्रियेचे टीकाकार- पूर्णराज, अमृतभारती, क्षेमेंद्र,चंद्रकीर्ति, माधव, वासुदेवभट्ट, मंडण, मेघरत्न, धनेश्वर, जगन्नाथ, काशीनाथ, भट्टगोपाळ, सहजकीर्ति, हंसविजयगणि, रामभट्ट, इत्यादि अनेक टीकाकारांनी सारस्वत प्रक्रियेवर टीका लिहिल्या आहेत. यापैकीं रामभट्टाच्या ग्रंथाचा विशेष हा कीं, त्यानें हा ग्रंथ वृध्दापकाळी आपल्या कुटुंबासह यात्रा करीत असतांना लिहिला असून यात्रेनिमित्त ज्या ज्या स्थळीं तो गेला, तेथील हकीकत त्याने आपल्या ग्रंथांत प्रत्येक भागाच्या शेवटी प्रशस्तांच्या कवितांत अंतर्भूत केली आहे. या हकीकतांवरून आपणांस तीनशे वर्षांपूर्वीच्या सामाजिक जीवनाची चांगली कल्पना होऊं शकते. रत्नाकार, नारायणभारती, क्षेमेंद्र, महीधर, इत्यादि आणखीहि जे टीकाकार झाले, त्यांची नांवे देऊन उगाच यादी वाढवीत बसण्यांत कांही अर्थ नाहीं.