प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.             
 
अनुभूति स्वरूपाचार्याची सारस्वतप्रक्रिया- उपर्युक्त पौराणिकतुल्य सोडल्यावर नंतर सारस्वतशाखेच्या इतिहासांत आपणांस सारस्वतप्रक्रिया ग्रंथाचा कर्ता अनुभूति स्वरूपाचार्य हा ग्रंथकार लागतो. याच्या पूर्वीहि या शाखेंत एकदोन ग्रंथकार झाले असतील, नाहीं असें नाही. पण अनुभूति स्वरूपाचार्याच्या वेळेला या शाखेंत इतका घोटाळा झाला होता कीं, तो दूर करण्यासाठीं त्यानें सर्व विषयाची पुन्हां पद्धतशीर मांडणी केली. अनुभूति स्वरूपाचार्य हा १२५०-१४५० याच्या दरम्यान केव्हां तरी झाला असावा. अनुभूति स्वरूपाचार्याच्या हातून सूत्रग्रंथाला कायम ठशाचें स्वरूप मिळाल्यानंतरच्या इतिहासांत टीकोपटीकांचाच नुसता भरणा आहे. १७५ वर्षाच्या अधींत १५एक टीकाकार झाले असतील. पण त्यापैकीं, स्वत:च्या बुध्दिनें कांहीतरी लिहिणारे फार थोडे.