प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ६ वें.
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-भाषाशास्त्रें-निरूक्त, व्याकरण व मीमांसा.      

प्राकृत भाषांची वाढ- पाणिनी, कात्यायन व पतंजलि ह्या तिघांनां व्याकरणशास्त्राचें मुनित्रय असें मानण्याचा प्रघात आहे. पंतजलीच्या महाभाष्यांत व्याकरणशास्त्राच्या विकासाचा निदान त्या काळापुरता तरी कळस झालेला दिसतो. पुढील तीन चार शतकें प्राकृत भाषांच्या वाढींतच गेल्यानें तीं संस्कृत व्याकरणाच्या विकासाच्या द्दष्टीनें जवळ जवळ टाकाऊच ठरतात. तेव्हा, पतंजलीवरून आपणांस एकदम चंद्रगोमिन् या वैयाकरणाकडे वळलें पाहिजे.