प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण २ रे.
प्राथमिक स्वरूपाचें ज्ञान लेखनपद्धती.            
 
चित्रलिपींचे पांच स्वतंत्र वंश:- वर जी जगांतील बहुतेक सर्व मुख्य मुख्य लिपीची टांचणरूपानें माहिती दिली आहे तिजकडे नजर फेकली असतां एक गोष्ट प्रामुख्यानें ध्यानांत येते. ती ही कीं. जगांतील लिपींत आज जरी कल्पनातीत विविधता दृष्टीस पडते तरी त्यांच्या उग्मार्शी वस्तुत: फारच थोड्या लिपी आहेत. आजच्या लिपीपैकी अधिकांश लिपी मिसरदेशीय चित्रलिपीपासून व भारतीय ब्राह्मी लिपीपासून निघालेल्या आहेत. चिनी व तत्संभव लिपींनी आज बराच भौगोलिक प्रदेंश व्यापला असून कीलाकृति लिपीनेंहि एकें काळी तत्कालीन संस्कृतिदृष्टया बर्‍याच महत्त्वाच्या भागावर प्रभुत्व गाजविलें होतें. आज ज्या प्राचीन मूल लिपीसंबंधीं अभ्यासकांस पुरेशी माहिती उपलब्ध झाली आहे त्यांत मेक्सिकन चित्रलिपि ही सर्वांत कमी महत्त्वाची होय. वर सांगितलेल्या इतर स्वतंत्र लिपीच्या मानानें ही बरीच अर्वाचीन असून ती ध्वन्यक्षरलिपीच्या पायरीपर्यंत येऊऩ पोंचते तोंच यूरोपीय वसाहतवाल्यांनी तिच्या स्वतंत्र विकासास आळा घातला.

हिटाइटलोक व त्यांची लिपि :- मूल लिपींपैकी प्राचीनत्वांत मिसरदेशीय, ब्राह्मी व चिनी या लिपीच्या जोडीला बसवितां येण्यासारखी परंतु जिच्या संबंधी अघाप पुरेशी माहिती उपलब्ध व्हावयाची आहे अशी लिपि म्हटली म्हणजे प्राचीन हिटाइट लोकांची चित्रलिपि होय. असुर राष्ट्राच्या उदयांपर्यत हिटाइट लोकांचें राष्ट्र हें वायव्यआशियांत सर्वांत प्रबळ असून ख्रि. पू. १७ व्या व १४ व्या शतकांच्या दरम्यान त्यांचे साम्राज्य जास्तीत जास्त विस्तार पावलें होतें. ख्रि. पू. बाराव्या शतकांत सेमेटिक लोक इजियन समुद्राकडे चालून आले तेव्हां त्यांच्या सत्तेस उतरती कळा लागून ख्रि. पू.७१७ मध्यें असुर लोकांनी त्यांची राजधानी कार्चेमिश काबीज करून घेतली तेव्हां त्याची सत्ता अजीबात नष्ट झाली. आशियामायनरच्या व सायप्रसच्या लिपींतील अक्षरें हिटाइट चित्रलिपीपासूनच बनलेलीं असल्याचें दाखविंता येईल.

ब्राह्मी लिपीचा विकास चित्रलिपीपासून झाला किंवा नाही व झाला असल्यास कोणत्या चित्रलिपीपासून झाला या विषयी आपलें पूर्ण अज्ञान आहे. ब्राह्मी व तत्संभव लिपी खेरीज करून इतर लिपींच्या उगमाशी पांच मोठ्या स्वतंत्रपणे विकास पावलेल्या चित्रलिपी होत्या. या चित्रलिपींचें ध्वनिसूचक लिपींत पुढें दिल्याप्रमाणें विकसन झालेलें दिसते:-

मिसर देशीय:- (१) स्मारकांवरील चित्रलिपि.(२) लिहिण्याची हिअरेटिक उर्फ पुरोहिती. (३) सेमेटिक वर्णमाला. (४) मोडी डेमेटिक. (५) कॉप्टिक म्हणजे ग्रीकसंभव पूर्वयूरोपीय वर्णमाला (अशंत:)

कीलीकृति:- (१) रेषात्मक बाबिलोनी चित्रलिपि. (२) प्राचीन बाबिलोनी कीलाकृति लिपि. (३) ससियन ध्वन्यक्षरलिपि.(५) असुरी कीलाकृति. (६)आर्मीनियन कीलाकृति किंवा अलारोडियन. (७) उत्तर बाबिलोनी (तृतीय हखामनी घराण्याच्या वेळची). (८) प्रोटोमेडिक (द्वितीय हखामनी घराण्याच्या वेळची). (९) पर्शियन कीलाकृति वर्णमाला (प्रथम हखामनी घराण्याच्या वेळची).

३. चिनी:- (१) कु-वेन चित्रात्मक कल्पनाचिन्हें.(२) चौरसाकार किऐ-शु उर्फ ‘ नमुनेदार ’ अक्षरें.(३) जपानी काताकाना ध्वन्यक्षरलिपि. (४) मोडी त्सौ-शु उर्फ गवती अक्षरें. (५) जपानी हिरागाना ध्वन्यक्षरलिपि.

(४) मेक्सिकन (१) अझटके चित्रात्मक कल्पनाचिन्हे. (२) युकाटनची मय वर्णमाला.

३ हिटाइट:- (१) कार्चैमिश चित्रलिपि. (२) आशियामायनर ध्वन्यक्षरलिपि. (३) लिशियन वर्णमाला ( अंशत: ). (४) सिप्रिऑट ध्वन्यक्षरलिपि.

ब्राह्मीसिभंव लिपीचा आपणांशी विशेष संबंध असल्यामुळें व सेमेटिकवंशोद्भव लिपींचा सांस्कृतिक दृष्टया महत्त्वाच्या अशा अनेक राष्ट्रांत प्रचार असल्यामुळें त्यांच्या वंशावळी पुढें दिल्या आहेत.

हिंदुस्थानांतील लिपींचा परस्परसंबंध दाखविणारा वंशवृक्ष
सेमेटिक वंशोद्भव लिपी