प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ३ रें.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति-संख्यालेखन.
अक्षरांकांनी संख्यालेखन:- अक्षरांकपद्धतीनें मोठ्या संख्या लिहिण्यास अडचण पडूं लागली तेव्हां कांहीं तरी चिन्ह लावून त्याच अक्षरांचा मोठ्या संख्या दर्शविण्याकडे उपयोग करण्याची युक्ति सुचली असावी. हिब्रू व ग्रीक अक्षरांचा अशा प्रकारें उपयोग होतहि होता. उदाहरणार्थ, € = १ व € = १०००, B=२ व B = २०००० इत्यादि. परंतु मोठ्या संख्येच्या उजव्या बाजुस नेहमीं लहान संख्या लिहावयाची असा एकदां निर्बंध करून टाकला कीं चिन्हांशिवायहि त्याच अक्षरांने मोठी संख्या व्यक्त होऊं शकते. उदाहरणार्थ, BWYX = २८३१ या संख्येत B ह्या अक्षराच्या मागें सहस्त्रवाचक चिन्ह नाहीं तरी W= ८०० ह्या अंकाच्या मागें तें अक्षर आलें असल्यामुळें त्याचा अर्थ दोन न करंतां दोन हजारच करावयाचा हें उघड दिसतें. या ठिकाणी आपणांस स्थानभेदाप्रमाणें अंकाची किंमत बदलूं शकते ही महत्त्वाची कल्पना बीजरूपानें पहावयास मिळते. बाबिलोनियन लोकांनां ही कल्पना यांच्या अगोदरच सुचली होती. ते साठ व साठाच्या वर्गानें मोजीत असून, त्यांच्यामध्यें ६० ला सॉस व ६०२ ला सार अशी नावें होतीं. सेंकेरा येथें सांपडलेल्या एका शिलेवर वर्गांची व घनांची एक यादी दिली आहे तींत ५९ चा वर्ग व तिसाचा घन हे अनुक्रमें ५८.१ व ७.३० अशा रीतीनें लिहिले आहेत. या ठिकाणीं पहिल्या संख्येतील टिंबाच्या डाव्या बाजूचा अंक सॉस दर्शवीत असून दुसरींत तो सारचा निदर्शक आहे व पहिलींतील उजव्या बाजूच्या अंकास त्याची मूळ किंमत असून दुसरींत तो सॉसची संख्या दाखवितो हें वाचणारास अनुमानानेंच ठरवावें लागतें. अवीमेडीस (ख्रिस्तपूर्व तिसरें शतक) वगैरे ग्रीक गणितीहि आपली उदाहरणें सोडविण्यांत एक प्रकारची दशांश पद्धतीच वापरीत असत परंतु त्या काळी शून्याच्या चिन्हाभावीं हल्लीरप्रमाणें दशकाचे, शतकाचे वगैरे आंकडे सहजगत्या ओळखतां येणें शक्या नव्हतें.