प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
कालगणनाशास्त्रामध्यें साधारणपणें तीन भाग पाडतां येतात. (१) वर्षांचे नामकरण किंवा एक वर्षांचा दुसर्या वर्षांशीं संबध दाखविण्याची पद्धति; (२) वर्षांतर्गत दिवसांचें वर्गीकरण करण्याची व नामकरण करण्याची पद्धति; व (३) एका दिवसाचे भाग पाडण्याची पद्धति. कालगणनाशास्त्राचा विकास म्हणजे वर सांगितलेल्या या तीन पद्धतींचा विकास होय.