प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
जैन कालमापन:- बौद्धांनी जर आपली विशिष्टकालमापनपद्धति तयार केली तर जैनांनीं तरी कां स्वस्थ बसावें? त्याचें ज्योतिषावर ग्रंथ आहेतच. पण जैनांच्या कालमापनाचा विशेष असा आहे कीं, त्यांनी युगमन्वंतरें यांसारखे अनेक दुसरे मोठमोठे कालसमुच्चय तयार केले आहेत; आणि अमुक तीर्थंकर अमुक कोटी वर्षें जगला, अमुक तीर्थंकर इतक्या लक्ष कोटी वर्षें जगला अशीं विधानें केलीं आहेत.