प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.
 
चीन, जपान व तिबेट कालमापन:- चीनमध्यें बौद्धांनी आपले उपवास व सण चिनी लोकांच्या चांद्र कालगणनेशीं जुळविले. सिलोनमध्यें बौद्ध भिक्षूचें ‘ लित ’ म्हणजे पंचाग बाळगणें हें कर्तव्य आहे. जपानमध्यें चिनी बौद्ध पंचांगपद्धति चालू होती. परंतु १८७२ सालीं जपान सरकारनें परंपरागत चांद्र कालगणनापद्धति रद्द करून पाश्चात्य सौरपद्धतीच सुरू केली. तिबेटमध्यें कालगणनापद्धति कांही अंशी भारतीय व कांही अंशी चिनी आहे. बारा व साठ बार्हस्पत्य संवत्सरांची योजना हिंदुस्थानांतून तेथें गेली;  तथापि तथापि त्यांनां जे शब्द वापरले गेले ते मात्र चिनी वापरले गेले.

निरनिराळ्या बौद्ध लौकांचे रिवाज पाहतां असें दिसतें कीं त्यामध्यें साप्ताहिक उपवासाचें जरी महत्व आहे तरी इतर सणांच्या बाबतींत सर्व लोकांत सारखेपणा किंवा एककालीनत्व आढळून येत नाहीं.