प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ४ थे.
प्राथमिक ज्ञानाची उत्पत्ति- कालगणना,
आणि तीसाठी प्रारंभबिंदूची योजना.

इजिअन कालगणना:- जगाच्या कालगणनेशीं असंबद्ध पण ज्यांची कालगणना बरीच प्रगत झाली होती अशा राष्ट्रांचा जातां जातां उल्लेख केला पाहिजे. इजिअन संस्कृतीमध्यें कालगणना कशी होती याविषयीं आपणांस स्पष्ट माहिती नाहीं. तथापि ग्रीक लोकांची कालगणनापद्धति इजिअन संस्कृतींतील पद्धतीचें परिणत स्वरूप असावें अशी कल्पना आहे. इजिअन कालगणनापद्धतीस केवळ मृत म्हणतां येणार नाहीं. ती प्रवाहपतित म्हणतां येईलं.