प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन - आफ्रिका व अमेरिका येथील वसाहती

परदेशगतांसंबंधाचे प्रश्न.- आज हिंदुस्थानांतील लोक बाहेर देशीं जातात त्यांच्यासंबंधानें खालील प्रश्न आपल्यापुढें उत्पन्न होतात.
(१) लोक कोणत्या पेशानें जातात ?
(२) ते परदेशीं गेले असतां त्यांस तेथील समाजांत स्थान कोणतें मिळतें ?
(३) आपल्या लोकांची तेथें संभावना तद्देशस्थांकडून कशी होते ?
(४) परदेशांत गेलेले हिंदू स्वदेशास पूर्णपणें पारखे होतील काय ?

वरील प्रश्न एकमेकांपासून अगदींच पृथक् नाहींत. तथापि आपण त्यांचें क्रमानें उत्तर द्यावयाचा प्रयत्‍न करूं.